ETV Bharat / state

अतिवृष्टी रब्बीच्या पथ्यावर; 'या' जिल्ह्यात पाच वर्षांत पहिल्यांदाच 171 टक्के रब्बीची पेरणी - जळगाव 171 टक्के रब्बीची पेरणी

गतवर्षी हवा तसा पाऊस न झाल्याने सर्वांच्याच आशांवर पाणी फिरले होते. रब्बी हंगामात केवळ 92 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यावर्षी 139 टक्के पाऊस झाला. त्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने हाती आलेला हंगाम निसर्गाने हिरावून घेतला. तर अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्व मोठी, लहान शंभर टक्‍क्‍यांवर भरून वाहू लागली. त्याचाच परिणाम आजही जमिनीत ओल कायम आहे.

जळगावात अतिवृष्टी रब्बीच्या पथ्यावर
जळगावात अतिवृष्टी रब्बीच्या पथ्यावर
author img

By

Published : Mar 8, 2020, 3:19 PM IST

जळगाव - जिल्ह्यात रब्बी हंगामात पाच वर्षातील सर्वाधिक पेरणी झाली आहे. पहिल्यांदाच या रब्बी हंगामात तब्बल 171 टक्के पेरणी झाली आहे, जिल्हा कृषी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हंगामात मागास पेरण्या झाल्या त्यातच जमिनीत ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची सर्वाधिक पेरणी केली आहे.

जळगावात अतिवृष्टी रब्बीच्या पथ्यावर

गतवर्षी हवा तसा पाऊस न झाल्याने सर्वांच्याच आशांवर पाणी फिरले होते. रब्बी हंगामात केवळ 92 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यावर्षी 139 टक्के पाऊस झाला. त्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने हाती आलेला हंगाम निसर्गाने हिरावून घेतला. तर अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्व मोठी, लहान शंभर टक्‍क्‍यांवर भरून वाहू लागली. त्याचाच परिणाम आजही जमिनीत ओल कायम आहे. खरीप जरी हाताचा गेला तरी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवर आशा कायम ठेवत गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांची सर्वाधिक पेरणी केली होती.

हेही वाचा - सरकारचे सकारात्मक निर्णय विरोधकांना बघवत नाहीत - मंत्री विश्वजित कदम

उन्हाळी पेरा सुरू -

उन्हाळी गहू, बाजरी, तीळ, तुरीचा पेरा अजूनही सुरूच आहे. शेतात ओल आहे. विहिरी, कूपनलिका, नाले यामध्ये पाण्याची पातळी कायम आहे. यामुळे शेतकरी कापूस उपटून त्याठिकाणी तीन महिन्यात येणारी वरील पिके घेत आहेत.

रब्बीचे अपेक्षित क्षेत्र -1 लाख 55 हजार हेक्‍टर
पेरणी झालेले क्षेत्र -2 लाख 65 हजार 508 हेक्‍टर

  • हरभरा -71 हजार हेक्‍टर
  • गहू - 77 हजार 133 हेक्‍टर
  • मका -70 हजार हेक्‍टर
  • ज्वारी - 46 हजार हेक्‍टर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.