ETV Bharat / state

Pune Police Team in Jalgaon : मराठा विद्या प्रसारक संस्था वाद प्रकरणी पुणे पोलिसाकंडून जळगावात चौकशी सुरू - Pune Police Team in Jalgaon

जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणी ( Maratha Vidya Prasarak Santha Case ) कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ( Kothrud Police Station ) या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले. ( Pune Police Team in Jalgaon ) यात पुणे पोलिसांच्या पथकात सुमारे 60 ते 70 पोलिसांचा समावेश आहे.

Pune Police Team in Jalgaon
पुणे पोलिसाकंडून जळगावात चौकशी सुरू
author img

By

Published : Jan 9, 2022, 7:12 PM IST

जळगाव - जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणी ( Maratha Vidya Prasarak Santha Case ) कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ( Kothrud Police Station ) या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले. ( Pune Police Team in Jalgaon ) यात पुणे पोलिसांच्या पथकात सुमारे 60 ते 70 पोलिसांचा समावेश आहे. याप्रकरणी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार आहे. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची चर्चा सुरू आहे.

पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण याबाबत माध्यमांशी संवाद साधताना

जळगावात या पाच संशयितांच्या घरी चौकशी सुरू -

कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे ७० जणांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले. पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्त्वात पाच पथकांकडून स्वंतत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे. निलेश रणजीत भोईटे, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईटे, नूतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख, प्रमोद काळे या पाचही लोकांच्या घरी पथकाकडून कागदपत्रांच्या चौकशीसह जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जळगावातील बहुचर्चित मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणात तक्रारदार अॅड. विजय भास्कर पाटील यांना पुण्यात एका फ्लॅटमध्ये बोलावून त्या ठिकाणी त्यांना डांबून ठेवले. मविप्र संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. याप्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हानंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. ठ

हेही वाचा - Eknath Khadse Critisize Girish Mahajan : 'मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणूनच गिरीश महाजनांना कोरोनाची लागण'

फिर्यादीत अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी म्हटले होते की, ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्याठिकाणी त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती.

हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. मात्र, त्यांनी उशिरा तक्रार केली आहे. याप्रकरणी आमदार गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.