ETV Bharat / state

अखेर एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी; मुख्यालयात बदली

शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील आर. के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 एप्रिल रोजी पहाटे याठिकाणी छापा टाकून मद्यतस्करीचा डाव हाणून पाडला होता.

psi transfered to jalgaon police headquarter
अखेर एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी; मुख्यालयात बदली
author img

By

Published : Apr 24, 2020, 11:13 PM IST

जळगाव - मद्यतस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. शिरसाठ यांची मुख्यालयात बदली झाली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार तात्पुरत्या काळासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील आर. के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 एप्रिल रोजी पहाटे याठिकाणी छापा टाकून मद्यतस्करीचा डाव हाणून पाडला होता. याप्रकरणी सुरुवातीला 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय जगन्नाथ जाधव, मुख्यालयातील पोलीस नाईक मनोज केशव सुरवाडे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत शांताराम पाटील यांचा देखील मद्यतस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

या प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगलेंच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर रणजित शिरसाठ आणि चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. उर्वरित चारही कर्मचाऱ्यांवर देखील कडक कारवाईचे संकेत डॉ. उगले यांनी दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. काही इतर पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा सादर झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कारवाईची पुढील दिशा ठरवतील, अशी शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.