ETV Bharat / state

बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनिल झंवर यांना दोन आठवडे अटकेपासून संरक्षण

author img

By

Published : Mar 3, 2021, 3:21 AM IST

बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा उद्योजक सुनील झंवर यांना मुंबई हायकोर्टाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे सुनील झंवर यांना आता न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मिळाणार आहे.

सुनिल झंवर
सुनिल झंवर

जळगाव - बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा उद्योजक सुनील झंवर यांना मुंबई हायकोर्टाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे सुनील झंवर यांना आता न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मिळाणार आहे.

आतापर्यंत पाच जणांना अटक

बीएचआर सहकारी पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडोर यांना हाताशी धरून, सुनील झंवर यांनी अनेक मालमत्ता कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुणे येथील न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवर यांच्यासह इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर आणि तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडोर यांना मात्र अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात सुनील झंवर हे वेषांतर करून जळगावात आल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र पोलिसांना त्यांचा पत्ता लागला नाही.

संशयित सुनील झंवर यांना दिलासा

सुनील झंवर यांनी फिर्याद रद्द होण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. झंवर यांना अटकेपासून दोन आठवडे संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता झंवर यांना न्यायालयात आपले म्हणणे मांडता येणार असून, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना दोन आठवड्याचा वेळ मिळाला असल्याने, झंवर यांना दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.