ETV Bharat / state

पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य; जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलाढाल - सोने खरेदीला प्राधान्य

यावर्षीच्या पाडव्याला सकाळी 9 ते 11 पर्यंत शुभ मुहूर्त होता. त्याचप्रमाणे दुपारी 12.30 ते 2 अमृत, दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 पर्यंत लाभ आणि सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत पुन्हा अमृत कालावधी असल्याने या मुहूर्तांवर सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफ बाजार गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य
author img

By

Published : Oct 28, 2019, 4:37 PM IST

Updated : Oct 28, 2019, 5:20 PM IST

जळगाव - बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर सोने तसेच चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे. जळगावच्या सराफ बाजारात पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी उसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सराफ बाजारात शुकशुकाट होता. मात्र, दिवाळीच्या काळात ग्राहकांच्या गर्दीने सराफ बाजार गजबजून गेला असून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा तसेच उत्साहाचा सण मानला जातो. अश्विनातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यादिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सोने तसेच चांदी खरेदीचे नियोजन केले आहे. दिवाळी पाडव्याला सोने खरेदीसह सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात अशा अनेक बाजूंनी दिवाळी पाडव्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे.

हेही वाचा - जळगावात मुसळधार पाऊस; बाजारपेठेत उडाली तारांबळ

यावर्षीच्या पाडव्याला सकाळी 9 ते 11 पर्यंत शुभ मुहूर्त होता. त्याचप्रमाणे दुपारी 12.30 ते 2 अमृत, दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 पर्यंत लाभ आणि सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत पुन्हा अमृत कालावधी असल्याने या मुहूर्तांवर सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफ बाजार गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य

जळगावचे सोने देशभरात प्रसिद्ध आहे. सोन्यामुळे जळगावची ओळख सुवर्णनगरी अशी आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी दूरवरचे नागरिक जळगावात येत असतात. सोमवारी सराफ बाजाराला सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर 39 हजार रुपये प्रतितोळा (3 टक्के जीएसटी अतिरिक्त) असे होते. तर चांदी सुमारे 46 हजार रुपये प्रतिकिलो होते. सोने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक होती. पाडव्याच्या मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जात असल्याने प्रत्येक जण आपापल्या परीने शक्य तेवढे सोने खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा - जामनेरात कांग नदीकाठच्या घरांमध्ये घुसले पाणी; संतप्त नागरिकांचा गिरीश महाजनांच्या घराला घेराव

सोने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण-

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या चढाओढीचा परिणाम सराफ बाजारावर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती दोलायमान असल्याने सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे देशांतर्गत सराफ बाजारावर मंदीचे सावट होते. मात्र, दिवाळीच्या काळात सराफ बाजारात चैतन्य संचारले असून आर्थिक उलाढाल वाढली आहे. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढे लग्नसराईला सुरुवात होणार असल्याने सराफ बाजारात उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

Intro:जळगाव
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर सोने तसेच चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे. जळगावच्या सराफ बाजारात पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी उसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सराफ बाजारात शुकशुकाट होता. मात्र, दिवाळीच्या काळात ग्राहकांच्या गर्दीने सराफ बाजार गजबजून गेला असून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

Body:दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा तसेच उत्साहाचा सण मानला जातो. अश्विनातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यादिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सोने तसेच चांदी खरेदीचे नियोजन केले आहे. दिवाळी पाडव्याला सोने खरेदीसह सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात अशा अनेक बाजूंनी दिवाळी पाडव्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे.

यावर्षीच्या पाडव्याला सकाळी 9 ते 11 पर्यंत शुभ मुहूर्त होता. त्याचप्रमाणे दुपारी 12.30 ते 2 अमृत, दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 पर्यंत लाभ आणि सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत पुन्हा अमृत कालावधी असल्याने या मुहूर्तांवर सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफ बाजार गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Conclusion:जळगावचे सोने देशभरात प्रसिद्ध आहे. सोन्यामुळे जळगावची ओळख सुवर्णनगरी अशी आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी दूरवरचे नागरिक जळगावात येत असतात. सोमवारी सराफ बाजाराला सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर 39 हजार रुपये प्रतितोळा (3 टक्के जीएसटी अतिरिक्त) असे होते. तर चांदी सुमारे 46 हजार रुपये प्रतिकिलो होते. सोने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक होती. पाडव्याच्या मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जात असल्याने प्रत्येक जण आपापल्या परीने शक्य तेवढे सोने खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सोने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण-

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या चढाओढीचा परिणाम सराफ बाजारावर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती दोलायमान असल्याने सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे देशांतर्गत सराफ बाजारावर मंदीचे सावट होते. मात्र, दिवाळीच्या काळात सराफ बाजारात चैतन्य संचारले असून आर्थिक उलाढाल वाढली आहे. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढे लग्नसराईला सुरुवात होणार असल्याने सराफ बाजारात उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
Last Updated : Oct 28, 2019, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.