ETV Bharat / state

Balshakti Award 2022 : जळगावच्या चिमुरडीला पंतप्रधानांच्या हस्ते बालशक्ती पुरस्कार - Shivangi Prasad Kalela Balshakti Award

आपल्या आईसह आपल्या बहिणीचे प्राण वाचवल्याने शिवांगी प्रसाद काळे (Balshakti Award 2022) या मुलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन कार्यक्रमात)बालशक्ती पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. (Shivangi Prasad Kalela Balshakti Award) गेल्या वर्षी शिवांगीने तिच्या आईचे तसेच तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचवले होते.

जवळगावच्या चिमुरडीला पंतप्रधानांच्या हस्ते बालशक्ती पुरस्कार

author img

By

Published : Jan 25, 2022, 1:17 AM IST

Updated : Jan 25, 2022, 6:12 AM IST

जळगाव - आईने नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडमधून देशसेवा केली तर मुलीने शौर्य पुरस्कार मिळवून जळगावचे नाव संपूर्ण देशात रोशन केले आहे. शिवांगी प्रसाद काळे (Balshakti Award 2022) असे या मुलीचे नाव असून तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन कार्यक्रमात)बालशक्ती पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी शिवांगीने तिच्या आईचे तसेच तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचवले होते. त्यामुळे तिला वीरता या कॅटेगीतून बालशक्ती पुरस्कार मिळाला आहे. (Shivangi Prasad Kalela Balshakti Award) प्रमाणपत्र व रोख १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शिवांगीला मिळालेल्या पुरस्कारामुळे जळगावचे नाव देशभरात पोहचले आहे.

व्हिडिओ

गुलबाक्षी या नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावरुन सेवानिवृत्त

प्रसाद सुरेश काळे हे त्यांची पत्नी गुलबाक्षी प्रसाद काळे व दोन मुली शिवांगी व ईशान्वी या परिवारासोबत जळगावातील कोल्हेनगरात वास्तव्यास आहे. प्रसाद काळे हे मेरीको या कंपनीत प्लॉट हेड म्हणून कामाला आहेत. गुलबाक्षी या नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावरुन देशसेवा केली आहे. त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत.

व्हिडिओ

हिटर लावले होते

(५ जानेवारी २०२१)हा दिवस काळे दाम्पत्य त्यांच्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. यादिवशी प्रसाद काळे हे नेहमीप्रमाणे कंपनीत गेले. तर गुलबाक्षी ह्या शिवांगी व ईशान्वी या चिमुकलींसह घरी होत्या. मुलींच्या अंघोळीसाठी त्यांनी बाथरुमध्ये एका बादलीत पाणी भरुन हिटर लावले. घरकामात त्यांनी पाण्यात हिटर लावले आहे, याचा विसर पडला. बाथरुमध्ये बटन बंद न करता त्या बादली उचण्यास गेल्या असत्या त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्याचा आरडाओरड ऐकून ईशान्वी व शिवांगी दोन्ही बाथरुमकडे पळाल्या. ईशान्वी आईकडे जाणार तोच तिला शिवांगीने पकडून बाजूला केले.

शिवांगीने प्रसंगावधान दाखवले

आईला विजेचा शॉक लागला असल्याचे लक्षात असल्यावर अवघ्या साडेपाच वर्षांच्या शिवांगीने कुठलाही विलंब न करता हुशारीने प्लास्टिकच्या खुर्चीवर उभे राहून हिटरचे बटन बंद केले अन् आईचा जीव वाचविला. जर शिवांगीने प्रसंगावधानता दाखविली नसतील तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. आईचे व बहिणीचे प्राण वाचवून शिवांगीने दाखविलेल्या धाडसाबद्दल तिला केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे बालशक्ती पुरस्कार जाहीर झाला होता. कोरोनामुळे ऑनलाईन पार पडलेल्या कार्यक्रमात सोमवारी शिवांगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी

आजही तो दिवस आठवला की अंगावर शहारे, जीवंत असेपर्यंत माझ्यासोबत घडलेली घटना मी कधीच विसरु शकणार नाही. केंद्रशासनाने माझ्या चिमुरडीने दाखविलेल्या धाडसाबद्दल तिला पुरस्कार तिला त्याबद्दल नक्कीच आनंद आहे. देशभरात दिल्या जाणार्‍या या पुरस्कासाठी आपल्या जिल्ह्यातील पाच वर्षांची चिमुकली शिवांगी ही पात्र ठरली. वीरता या कॅटेगीरीमधून तिला पुरस्कार मिळाला आहे. एवढ्या लहान वयात चिमुकलीने मिळवलेला हा पुरस्कार नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा - पंतप्रधानांनी महिलांची माफी मागावी; अन्यथा महिला काँग्रेस रस्त्यावर आंदोलन उभारणार- महिला काँग्रेसच्या अध्यक्षा

Last Updated : Jan 25, 2022, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.