ETV Bharat / state

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जळगावसाठी एक लाख रुपयांची मदत - जळगाव कोरोना न्यूज

जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस सोसायटीसह अन्य संस्थांनी आर्सेनिक अल्बम-30 औषधाचे वाटप सुरू केले आहे. या उपक्रमाला मदत व्हावी म्हणून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी एक लाख रुपयांचा धनादेश रेडक्रॉस सोसायटीच्या खात्यावर जमा केला आहे. जिल्हा प्रशासनाचे 11 लाख 50 हजार कुटुंबाना गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.

Pratibhatai Patil
प्रतिभाताई पाटील
author img

By

Published : Jun 26, 2020, 5:35 PM IST

जळगाव - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात नागरिकांना अर्सेनिक अल्बम -30 गोळ्यांचे वाटप करण्यासाठी 1 लाख रुपये दिले आहेत. त्यांनी हा धनादेश रेडक्रॉस सोसायटीच्या खात्यावर जमा केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप दानशूर व्यक्तींच्या मदतीने जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक योगदानातून जिल्ह्यातील 100 टक्के कुटुंबांना आर्सेनिक अल्बम-30 या औषधाचे वाटप करण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. याकरीता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवकाचे श्रमदान, दानशूर व्यक्तींचे आर्थिक योगदान, जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आत्तापर्यंत आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधांच्या 3 लाख 37 हजार बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. अंगणवाडी सेविका, आशाताई, स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन त्या मोफत वाटण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 11 लाख 50 हजार कुटुंबाना हे औषध मोफत वाटप करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या माहेरच्या जिल्ह्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असल्याची माहिती प्रतिभाताई पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने एक लाख रुपयांचा धनादेश रेडक्रॉस सोसायटीच्या खात्यावर जमा केला आहे. गाडीलकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाने या उपक्रमासाठी यापूर्वीच एक लाख रुपयांची मदत केली आहे. जिल्ह्यातील इतरही अनेक संस्था मदत करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.