ETV Bharat / state

जळगाव हादरले, पैशांच्या वादातून तरुणाची गळा चिरुन हत्या

अमळनेर येथे पैशांच्या वादातून एका 35 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याचे समोर आले आहे. प्रकाश दत्तू चौधरी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी संशय व्यक्त केलेला आरोपी फरार आहे.

Jalgaon
Jalgaon
author img

By

Published : Aug 27, 2021, 12:00 PM IST

जळगाव : पैशांच्या वादातून एका 35 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाली. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील हाशिम प्रेमजी व्यापारी संकुलात गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. ही घटना आज (27 ऑगस्ट) सकाळी उजेडात आली. या घटनेमुळे अमळनेर शहर हादरले आहे. प्रकाश दत्तू चौधरी (वय 35) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश हा अमळनेरातील गांधलीपुरा भागातील रहिवासी होता.

घटना अशी आली उजेडात -

अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या हाशिमजी प्रेमजी व्यापारी संकुलात आज सकाळी नेहमीप्रमाणे नगरपालिकेचे सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यांना एक तरुण त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मयत तरुणाची पटली ओळख -

पोलिसांनी प्राथमिक चौकशीत मयत तरुणाची ओळख पटवली. तो गांधलीपुरा भागातील रहिवासी असलेला प्रकाश चौधरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

आरोपी निष्पन्न?

घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. त्यात प्रकाश चौधरी याची हत्या पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रकाशची हत्या कैलास पांडुरंग शिंगाणे नामक व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी कैलास हा फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - पती बरोबरच पत्नीच्याही नावावर करा संपत्ती; केजमध्ये शेकडो महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.