ETV Bharat / state

जळगावात भरधाव टँकरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - जळगाव

पोलीस कर्मचारी पाटील हे जळगाव पोलीस मुख्यालयात पोलीस वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी काम आटोपल्यानंतर जळगावहून घरी एरंडोलला परतत होते. त्यावेळी त्यांची दुचाकी एरंडोलजवळ आली असता गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली.

मृत पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Jun 3, 2019, 8:05 AM IST

Updated : Jun 3, 2019, 11:44 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल शहराजवळ भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश तुकाराम पाटील (वय ४५) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पाटील हे जळगाव पोलीस मुख्यालयात पोलीस वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी काम आटोपल्यानंतर जळगावहून घरी एरंडोलला परतत होते. त्यावेळी त्यांची दुचाकी एरंडोलजवळ आली असता गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली. त्यामध्ये पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत मधुकर राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालक शादाब मोईनोद्दीन याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:जळगाव
ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव जाणाऱ्या गॅस टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल शहराजवळ घडला. प्रकाश तुकाराम पाटील (वय 45, रा. जहांगीरपुरा, एरंडोल) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.Body:प्रकाश पाटील हे पोलीस मुख्यालयात पोलीस वाहनावर चालक म्हणून सेवारत होते. आज दुपारी ड्युटी आटोपून ते जळगावहून घरी एरंडोलला परतत होते. घरी परतत असताना एरंडोळजवळ त्यांच्या (एमएच 19 बीबी 4176) क्रमांकाच्या दुचाकीला (जीजे 12 एटी 8361) क्रमांकाच्या गॅस टँकरने ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिली. त्यात प्रकाश पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.Conclusion:मयत प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत मधुकर राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालक शादाब मोईनोद्दीन (रा. पतुलकी, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादाब याला पोलिसांनी अटक केली आहे.
Last Updated : Jun 3, 2019, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.