ETV Bharat / state

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे व खते पुरविण्याचे नियोजन - पालकमंत्री - karip season

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणं, खते तसेच विद्युत पुरवठ्यासह विविध विषयांवर चर्चा करून नियोजन करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : May 1, 2020, 2:30 PM IST

Updated : May 1, 2020, 3:19 PM IST

जळगाव - खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी गट तसेच उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बियाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करावी. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलबध करुन द्यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश, विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शेख, जळगाव जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायती कापसाची लागवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता यावे, म्हणून वीज वितरण कंपनीने लागवडीच्या काळात आठवड्यातून किमान चार दिवस वीज उपलब्ध करुन द्यावी. वीज वितरणाचे वेळापत्रक बदलण्यासाठी आवश्यकता भासल्यास उर्जामंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा तयार कराव्यात. याशिवाय शेतकऱ्यांना लावगडीसाठी भांडवलाची आवश्यकता असते, ही बाब लक्षात घेत बँकांनी लवकरात लवकर पीककर्जाचे वाटप करावे. कर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत.त्याचबरोबर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी गिरणा धरणातून एक आर्वतन पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता कृषी विभागाची जास्तीत जास्त कामे नरेगाच्या माध्यमातून करावीत. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. एसएमएसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाला या डेटाचा उपयोग करता येईल. जेणेकरुन शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती पोहोचविणे शक्य होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या. तर, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 64.66 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आल्याचे जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे याकरीता 'बालक ते पालक' या तत्वानुसार मुलगा व वडील या दोघांनाही प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 100 शेतीशाळा घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. त्यानुसार गटशेतीच्या माध्यमातून 'एक गट, एक वाण' हा उपक्रम राबविणार असल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध -

सध्या जिल्ह्यात 5 लक्ष 15 हजार बीटी बियाणे उपलब्ध असून 42 हजार मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांनी थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार आत्तापर्यंत सुमारे 17 हजार क्विंटल फळे व भाजीपाला विक्री करण्यात आला आहे. जिल्ह्यात 10 हजार 834 शेतकऱ्यांना 10 कोटी 19 लाख रुपये पिकविमा संरक्षित रक्कम प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत दिली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 'शेतकरी ते ग्राहक' संकल्पनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकारचा शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

Last Updated : May 1, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.