जळगाव - इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ( Indian Ministry Of Defence ) अंतर्गत निमास संस्थेच्या विविध कोर्स मधील ''व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग'' ( White Water River Rafting ) कोर्स शिकवला जातो. भारतात हा कोर्स सर्वात कमी वयात करणारी पाचोऱ्यातील सहिष्णा सोमवंशी ही पहिली कन्या ( Sahishna Somvanshi First India River Rafting ) ठरली आहे
अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सिमेवर भारतीय सैन्य दलाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स ( National Institute of Mountaineering and Allied Sports ) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत उपयोग घेण्यासाठी महिला आणि पुरुषांनी सक्षम असावे यासाठी अकरा दिवसाचा कॅम्प आयोजित केला जातो. यामध्ये माउंटनींग, कुबा डायव्हिंग, पॅरा लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग असे कोर्स केले जातात. येथे शुन्य तापमान असून, टेन्ट मध्ये राहणे सैन्या प्रमाणे जेवण घेणे अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करावे लागते. यासाठी यासाठी पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाही. परदेशात अशा कोर्सला खुपच महत्व दिले जाते. त्यात जगात व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग मध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षक कडुन हे सर्व कोर्स शिकवले जातात.
सहिष्णा ठरली भारतात पहिली
भारतातुन पाचोऱ्यातील सहिष्णा सचिन सोमवंशी ( वय 18 ) ही सर्वात कमी वयात व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग करणारी मुलगी ठरली. तिने हा बहुमान खान्देश ला दिला आहे. तिच्या यशात तिचे पालक सचिन सोमवंशी व आई सुप्रिया सोमवंशी आजोबा आजी यांचा सहभाग आहे.
याबाबत बोलताना सहिष्णा सोमवंशी म्हणाली की, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन हा कोर्स करण्यासाठी उत्तेजित करावे. या कोर्स मुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो असून, यासाठी मी मार्गदर्शन करण्यास तयार आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी या कोर्ससाठी अनुदान द्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात विद्यार्थी युवक युवती मधील आत्मविश्वास वाढेल, अशी आशाही तीने व्यक्त केली.
हेही वाचा - Best Double Decker Buses : मुंबईच्या रस्त्यांवर 900 डबल डेकर बसेस धावणार, आदित्य ठाकरेंची घोषणा