ETV Bharat / state

मोहाडीतील रुग्णालय ठरले संजीवनी; अडीच महिन्याच्या काळात 1160 रुग्णांची कोरोनावर मात

author img

By

Published : May 26, 2021, 8:00 PM IST

सेवाभावी संस्थांची प्रशासनाला साथ मिळाल्यानंतर रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणून जळगावातील मोहाडी येथील रुग्णालयाकडे पाहता येईल. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात या रुग्णालयातून 1 हजार 160 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

Mohadi Hospital Corona Patient Discharge
मोहाडी रुग्णालय कोरोना उपचार

जळगाव - सेवाभावी संस्थांची प्रशासनाला साथ मिळाल्यानंतर रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणून जळगावातील मोहाडी येथील रुग्णालयाकडे पाहता येईल. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात या रुग्णालयातून 1 हजार 160 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सेवाभावी संस्था आणि प्रशासनाच्या परस्पर समन्वयातून निर्माण झालेल्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची परवड झाली नाही. हे रुग्णालय कोरोनाच्या उपचारासाठी खऱ्या अर्थाने एक 'रोल मॉडेल' ठरले आहे.

माहिती देताना समन्वयक आणि वैद्यकीय अधिकारी

हेही वाचा - जळगावनंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपला धक्का? 6 नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जळगाव शहर हे हॉटस्पॉट ठरले होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने रुग्णांची फरफट सुरू होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला जळगावातील सेवारथ संस्था, रोटरी क्लब, मराठा प्रीमियर लीग, लेवा पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन, रेडक्रॉस सोसायटी आणि जैन इरिगेशन कंपनीने प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. यात मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयाच्या अर्ध्या इमारतीत कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. 100 बेडसाठी सुसज्ज व्यवस्था उभारण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील स्टाफ रुग्णांवर उपचार आणि देखभालीसाठी नेमण्यात आला. अशा परिस्थितीत विविध सेवाभावी संस्था जिल्हा प्रशासनाच्या मदतीला धावून आल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे शक्य झाले.

सेवाभावी संस्थांनी अशी सांभाळली जबाबदारी

मोहाडी रुग्णालयासाठी सेवारत संस्थेतर्फे डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठीया, दिलीप गांधी, पुखराज पगारिया यांच्या माध्यमातून 8 रुग्णवाहिका, तसेच 45 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देण्यात आले. लेवा पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन व मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून चंदन कोल्हे, महेश चौधरी, नितीन धांडे, हिरेश कदम, श्रीराम पाटील हे सर्वजण या ठिकाणी रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील स्टाफसाठी जेवणाची व्यवस्था सांभाळत आहेत.

रुग्णालयाच्या आवारातच एका खोलीत स्वतंत्र किचन करण्यात आले असून, त्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ ताजे जेवण बनवले जाते. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रुग्णालयासाठी 6 ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत. रोटरी क्लबकडून 60 ऑक्सिजन बेडची पाईपलाईन करण्यात आली आहे. जैन उद्योग समुहाने 70 सर्जिकल बेड दिले आहेत. विशेष म्हणजे, सर्व सेवाभावी संस्था नियोजनात सहभागी असतात.

...तर आपण समर्थपणे तिसऱ्या लाटेचा सामना करू - डॉ. रितेश पाटील

मोहाडी रुग्णालयाच्या यशाबद्दल बोलताना समन्वयक डॉ. रितेश पाटील म्हणाले की, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यात समन्वय व एकत्रीकरणातून गरजू रुग्णांना अत्यंत चांगली रुग्णसेवा उपलब्ध केली जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मोहाडी रुग्णालय आहे. या रुग्णालयातून आतापर्यंत 1160 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने फक्त एका रुग्णाचा याठिकाणी मृत्यू झाला. मोहाडी रुग्णालयाच्या धर्तीवर तालुकास्तरावर सेवाभावी संस्था व प्रशासनाचे एकत्रीकरण झाले तर कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा सामना आपण सहज करू शकतो, असेही डॉ. रितेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

रुग्णांवर उपचारासोबत समुपदेशनही होते

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील म्हणाले की, या रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा तर दिली जाते. पण, त्यासोबतच रुग्णांसाठी योगासन व प्राणायाम वर्ग देखील घेतले जातात. ज्या रुग्णांच्या मनात कोरोनाची भीती आहे, त्यांच्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांकडून समुपदेशनाचे वर्ग देखील घेतले जातात. रुग्णांशी नियमित संवाद साधून त्यांच्या मनातून कोरोनाची भीती घालवली जाते. या सार्‍या उपाययोजनांचे फलित म्हणून अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णालयात हळूहळू आरोग्य सेवांचा विस्तार केला जात आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - काय सांगता...कराचा भरणा केल्यास मिळणार एक तोळे सोन्याची चैन, पैठणी आणि बरेच काही!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.