ETV Bharat / state

'गुगल पे'वरून ३७ हजारांची फसवणूक

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. जळगावमधील एका व्यक्तीची मोबाइल रिचार्जच्या नावाखाली ३७ हजार ४८१ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

Online Fraud
ऑनलाइन फसवणूक
author img

By

Published : Sep 16, 2020, 3:15 PM IST

Updated : Sep 16, 2020, 3:22 PM IST

जळगाव - सध्या ऑनलाइन पेमेंट करण्याकडे जनतेचा कल वाढत आहे. यातील अनेकजण सहजासहजी सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात. जळगावच्या एका व्यक्तीची अशीच ऑनलाइन फसवणूक झाली आहे. अफजलखान बिस्मील्लाखान (वय ३१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो शिवाजीनगरचा रहिवासी असून मेकॅनिक म्हणून काम करतो.

माहिती देताना पोलीस उप-अधीक्षक रोहन निलाभ

'गुगल पे’ या अ‍ॅपववरून केलेल्या मोबाईल रिचार्जसाठी अफजलखानच्या बँक खात्यातून १४९ रुपये कमी झाले. मात्र, मोबाईल रिजार्च झाला नसल्याने त्याने 'गुगल पे'च्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. पण तो क्रमांक फसवणूक करणाऱ्या भामट्याचा निघाला. त्याच्या सांगण्यावरुन अफजलखानने 'एनी डेस्क' हे अ‌ॅप डाऊनलोड केले व एटीएमवरील १६ अंकी क्रमांकही त्याला सांगितला. त्यानंतर अवघ्या ४ मिनिटांच्या कालावधीत चार ट्रान्झॅक्शन होऊन त्याच्या बँक खात्यातून ३७ हजार ४८१ रुपये काढून त्याची फसवणूक झाली. ११ सप्टेंबरला दुपारी हा प्रकार घडला.

नेमके काय घडले?

‘गुगल पे’वरून अफजलखानने १४९ रुपयांचा मोबाइल रिचार्ज केला. त्याच्या एसबीआयच्या खात्यातून १४९ रुपये कमी झाले. मात्र, मोबाइलचा रिचार्ज झाला नाही. त्यामुळे त्याने गुगलवरच ‘गुगल पे’चा कस्टमर केअर क्रमांक शोधला असता त्याला ७४३९४९८२९३ हा क्रमांक मिळाला. त्यावर अफजलने संपर्क साधला. त्यावेळी फोन ठेवा, तुम्हाला कॉल करतो, असे सांगण्यात आले. त्यानुसार ९८३२९४०७४० या क्रमांकावरुन त्याच्या मोबाइलवर फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने त्याला मोबाइलमध्ये एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आलेला क्रमांक विचारला. त्यानंतर मोबाइलमधील ‘गुगल पे’ अ‍ॅप ओपन करण्यास सांगितले. ४९९९८ हा कोड टाकण्यास सांगितले. परंतु, तो सेंड झाला नाही. त्यानंतर आरोपी व्यक्तीने पीडित व्यक्तीच्या एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक व त्यावरील नाव सांगण्यास सांगितले. त्यानुसार अफजलनेही एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक व त्यावरील नाव सांगितले. आरोपीने तुमचे १४९ रुपये बँक खात्यात जमा होतील, असे त्याला सांगितले.

त्यानंतर सायंकाळी ५.५४ ते ५.५६ या ४ मिनिटांच्या कालावधीत अफजलच्या बँक खात्यातून १७ हजार ७३८ रुपये, ८ हजार ५९०, १ हजार १५४ व ९ हजार ९९९ रुपये असे एकूण ३७ हजार ४८१ रुपये काढून घेतल्याचे संदेश त्याच्या मोबाइलवर आले. त्यानंतर त्याने बँक खाते तपासले असता ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ७४३९४९८२९३ व ९८३२९४०७४० या क्रमांकाच्या मोबाईलधारका विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 16, 2020, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.