ETV Bharat / state

भुसावळमध्ये एका चाकूने हल्ला करत गोळ्या झाडून खून

भुसावळ शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका 38 वर्षीय व्यक्तीची चाकूने हल्ला करत व गावठी कट्ट्याने गोळीबार करत खून करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

vilas chaudhari
मृत विलास चौधरी
author img

By

Published : Aug 26, 2020, 3:18 PM IST

Updated : Aug 26, 2020, 10:32 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले. भुसावळ शहरातील श्रीरामनगर भागातील एका 38 वर्षीय तरुणाचा चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी (25 ऑगस्ट) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास खून केला. मारेकऱ्यांनी सुरुवातीला तरुणावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. विलास चौधरी (वय 38 वर्षे, रा. श्रीराम नगर, भुसावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत विलास चौधरी हा श्रीराम नगरातील रहिवासी आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी खून केला. विलास याच्यावर अचानकपणे चार ते पाच व्यक्तींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीही झाडली. त्यामुळे विलास गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर काही नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु, अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला.

शहरात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी काही नागरिकांचे जबाब नोंदवले. या घटनेमागे पूर्ववैमनस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. तरीही पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे पोलीस उपअधीक्षक राठोड यांनी सांगितले. पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

हेही वाचा - निकृष्ट जेवणावरून कैदी आणि कारागृह रक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी

Last Updated : Aug 26, 2020, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.