ETV Bharat / state

जळगावमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालक अटकेत

author img

By

Published : Oct 26, 2020, 3:13 PM IST

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर दुचाकीने कामावर जात असलेल्या एकाजणाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सदर व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

जळगावमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव - जळगाव-औरंगाबाद महामार्गावर दुचाकीने कामावर जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज(सोमवार) सकाळी उमाळे फाट्यानजीक घडली. ट्रकसह चालकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डिगंबर सोनू नेमाडे (वय ६५, रा. गजानन नगर, काशिनाथ लॉजजवळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, डिगंबर नेमाडे हे एमआयडीसीतील भाग्यश्री प्लास्टिक कंपनीत कामाला आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी १० च्या सुमारास कंपनीत कामाला जात असताना चिंचोली-उमाळे गावादरम्यान राधाकृष्ण लॉनजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांच्या ओळखीचे मित्र भगवान सुकलाल निकम हे दुकानावर जात असताना त्यांनी जखमी अवस्थेतील नेमाडे यांना ओळखले. निकम यांनी तातडीने जखमी डिगंबर नेमाडेंना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले असून चालकास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सपोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संतोष पवार, संदीप धनगर करीत आहेत.

दरम्यान, डिगंबर नेमाडे हे जळगावात एकटे राहत होते. १ वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात गिरीष आणि मनोज हे दोन मुले असून दोन्ही नोकरीच्या निमित्ताने नाशिक आणि पुणे येथे स्थायिक झाले आहेत.

हेही वाचा - 'भाजपमध्ये राहिलो असतो तर माझा आडवाणी, वाजपेयी केला असता'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.