ETV Bharat / state

चार मजली इमारतीच्या छतावरून पडून प्रौढाचा मृत्यू - Jalgaon News Update

जळगावमध्ये चार मजली अपार्टमेंटच्या छतावरुन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज ही घटना उघडकीस आली. विजय प्रल्हाद शिनकर (वय ४८, रा. भिकमचंद जैन नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, शिनकर हे छतावरून कसे पडले, की त्यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही. घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत.

चार मजली इमारतीच्या छतावरून पडून प्रौढाचा मृत्यू

author img

By

Published : Jan 30, 2021, 7:23 PM IST

जळगाव - भिकमचंद जैन नगरात चार मजली अपार्टमेंटच्या छतावरुन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज ही घटना उघडकीस आली. विजय प्रल्हाद शिनकर (वय ४८, रा. भिकमचंद जैन नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, शिनकर हे छतावरून कसे पडले, की त्यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही. घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत.

शिनकर हे वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करत होते. मुळचे वरणगाव येथील शिनकर कुटुंबीय गेल्या दोन वर्षांपासून भिकमचंद जैन नगरात राहण्यासाठी आले होते. या ठीकाणी सिद्धांत अपार्टमेंटमध्ये चवथ्या मजल्यावर त्यांनी स्वत:चे घर घेतले आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिनकर हे शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पत्नी कल्पना, मुलगी श्रद्धा व मुलगा सारंग यांच्याशी गप्पा मारत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसून आला नाही. गप्पागोष्टी केल्यानंतर शिनकर कुटुंबीय झोपी गेले.

सकाळी आढळले मृतावस्थेत

सकाळी त्यांचा मुलगा सारंग झोपेतून उठला. यावेळी वडील घरात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने बहिणीला झोपेतून उठवून हा प्रकार सांगीतला. यांनतर सारंग व श्रद्धा या दोघांनी अपार्टमेंटमध्ये शोध सुरू केला. नंतर ते छतावर गेले. तेथुन खाली पाहिले असता शिनकर हे अपार्टमेंटच्या पुढच्या बाजुला कपाऊंडमध्ये पडलेले दिसून आले. त्यांनी आई कल्पना यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी शिनकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. छतावरुन खाली पडण्यापूर्वी ते कपांऊंडच्या भिंतीलगत असलेल्या विजेच्या खांबावर देखील आदळले होते. त्यामुळे विजेची तार देखील तुटलेली आढळून आली.

चार मजली इमारतीच्या छतावरून पडून प्रौढाचा मृत्यू

शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

अपार्टमेंटमधील लोकांच्या मदतीने शिनकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. यांनतर शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिनकर यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगी श्रद्धा व मुलगा सारंग असा परिवार आहे. श्रद्धा सीएचे शिक्षण घेते आहे, तर सारंग सातवीच्या वर्गात आहे. या घटनेमुळे शिनकर कुटुंबीय, व नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला आहे.

छतावर का गेले? याची माहिती नाही

वैद्यकीय प्रतिनिधी असलेले शिनकर हे मुळचे वरणगाव येथील रहिवासी आहेत. गेल्या दाेन वर्षांपूर्वीच ते जळगावात राहण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी जळगावात घर खरेदी केले. तसेच सध्या प्लॉट खरेदी करण्याची तयारी करत होते. ते पहाटे कोणाला काहीच न सांगता छतावर का गेेले? याची माहिती कुटुंबीयांना देखील कळू शकली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.