ETV Bharat / state

#World Tiger day : जळगावातील पट्टेदार वाघ झाला 'बनाना टायगर', हे आहे कारण - मेळघाट अभयारण्य-अंबा बरुआ अभयारण्य-वढोदा वनपरिक्षेत्र-यावल अभयारण्य

वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या अस्तित्त्वाचे दाखले पूर्वीपासूनच आहेत. जिल्हा हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वाघांना केळीच्या बागांमध्ये असलेला गारवा आकर्षित करतो. वन्यजीव अभ्यासकांच्या मते वढोदा भागात केळीच्या बागांमध्ये वाघाची तिसरी ते चौथी पिढी आज वास्तव्यास आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:44 PM IST

Updated : Jul 29, 2019, 11:43 PM IST

जळगाव - गेल्या काही वर्षांपासून जंगलतोड, परदेशी वनस्पतीची झालेली वाढ, जंगलात पुरेशा भक्ष्याचा अभाव तसेच अधिवास शिल्लक नसल्याने जळगाव जिल्ह्यातील वाघ आता केळीच्या शेतांचा आसरा घेत आहेत. त्यामुळे या वाघांना 'केळीचा वाघ' म्हणून ओळखले जात आहे. या बागायतदार वाघाच्या संवर्धनासाठी या भागातील शेतकऱ्यांना जागृत करण्याची गरज आहे. त्यासाठी आज जागतीक व्याघ्र संवर्धन दिनाच्यानिमित्ताने वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने रॅली काढण्यात आली.

#World Tiger day : जळगावातील पट्टेदार वाघ झाला 'बनाना टायगर', हे आहे कारण

वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या अस्तित्त्वाचे दाखले पूर्वीपासूनच आहेत. जिल्हा हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वाघांना केळीच्या बागांमध्ये असलेला गारवा आकर्षित करतो. वन्यजीव अभ्यासकांच्या मते वढोदा भागात केळीच्या बागांमध्ये वाघाची तिसरी ते चौथी पिढी आज वास्तव्यास आहे. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावातील बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातला वाघ देखील आता बागायतदार झाला आहे. या बागायतदार वाघाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग मिळविणे. तसेच शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्था करीत आहे. गेल्या ९ वर्षांपासून या संस्थेकडून जळगाव वन विभागाच्या सहकार्याने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दरवर्षी २८ व २९ जुलै ला टायगर रॅली काढली जाते. यावर्षी या रॅलीचे नववे वर्ष होते. जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी 'वाघ वाचवा' हा संदेश देत वढोदा येथे जातात. २ दिवस त्या भागात वाघ वाचवण्याबाबत जनजागृती करतात. वाघ वाचवण्याच्या या चळवळीला लोकसहभाग व राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली, तर जगण्यासाठी धडपड करणाऱ्या जिल्ह्यातील बागायदार वाघाचे अस्तित्त्व टिकून राहणार आहे.

जळगाव जिल्हा हा वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात यावल आणि जळगाव हे दोन स्वतंत्र वनपरिक्षेत्र आहेत. यावल वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांमुळे, तर जळगाव वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग वन व वन्यजीव वैविध्यतेने संपन्न आहे. जिल्ह्यातील या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांचे अस्तित्त्व आहे. या वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी वन्यजीवप्रेमींची आग्रही मागणी आहे. वन्यजीवप्रेमींच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली पाहिजे. शासनाने देखील याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे.

यावल अभयारण्यांतर्गत चोपडा, यावल व रावेर तालुक्याचा काही भाग मोडतो. जळगाव अभयारण्याअंतर्गत जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव या तालुक्यातील वनक्षेत्र येते. जळगाव वनविभागातील वढोदा वनक्षेत्रात सुरुवातीला वाघाचे अस्तित्त्व आढळून आले. तत्कालीन वनक्षेत्रपाल डी. आर. पाटील यांनी वाघाचे अस्तित्त्व सर्वप्रथम मान्य केले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी २९ जुलै २०११ मध्ये वढोदा वनक्षेत्राला भेट देवून वाघाचे अस्तित्त्व अधोरेखित केले होते. जळगाव जिल्ह्यात वाघ असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन प्रधान वनसचिव यांनी वढोदा व डोलारखेडा वनक्षेत्राला भेट दिली होती. प्रधान वनसचिवांच्या पाहणीत वाघांच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. तेव्हा वढोदा व डोलारखेडा वनक्षेत्रात वाघांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब झाले होते. आज यावल आणि जळगाव वनक्षेत्रात सुमारे ६ ते ७ पट्टेदार वाघ अस्तित्त्वात आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वनविभागाकडून ते जाहीर केले जात नाही. जिल्ह्यात वाघांचे अस्तित्त्व असणे ही आनंददायी बाब असली तरी या वाघांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

जळगावातील पर्यावरणप्रेमी अभय उजागरे यांनी जिल्ह्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमींना एकत्र आणून एक चळवळ सुरू केली. त्यापाठोपाठ वन्यजीव संरक्षण संस्था आणि सातपुडा बचाव समितीने देखील ही चळवळ अविरतपणे सुरू ठेवली आहे. २ वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात वसुंधरा महोत्सव पार पडला. या महोत्सवाच्या निमित्ताने जळगावात व्याघ्र परिषद झाली होती. याच परिषदेच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनाचा मुद्दा समोर आला. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही वनक्षेत्रात वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाल्यानंतर वढोदा परिसर व्याघ्र संवर्धन प्रकल्प व्हावा, ही सातपुडा बचाव समितीची आग्रही मागणी होती. यासंदर्भात सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी तसा आराखडा तयार करून तो वनविभागाकडे पाठवला होता. या प्रकल्पाची 'मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प' या नावाने गॅझेटमध्ये अधिकृपणे नोंद करण्यात आली आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्प म्हणून हे क्षेत्र घोषित झाले आहे. आता या क्षेत्राच्या संवर्धनाचे काम महत्त्वाचे आहे.

'टायगर कॉरिडॉर'ची गरज-
जिल्ह्यातील दोन्ही वनक्षेत्रात वाघांना मुक्त संचार करता यावा, यासाठी टायगर कॉरिडॉर अर्थात व्याघ्र संचार मार्ग तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातपुडा बचाव समितीच्या पाठपुराव्यानुसार मेळघाट अभयारण्य-अंबा बरुआ अभयारण्य-वढोदा वनपरिक्षेत्र-यावल अभयारण्य ते अनेर डॅम वनक्षेत्र असा कॉरिडॉरचा प्रस्ताव जुलै २०१३ मध्ये शासनाला सादर करण्यात आला आहे. यातील सर्वात मोठा टप्पा हा नैसर्गिक कॉरिडॉर आहे. उर्वरित ‌ठिकाणी मात्र भूसंपादन करून जंगल तयार करावे लागणार आहे. मात्र, शासनाने अद्याप या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. वन्यप्रेमींकडून या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

गौताळा कॉरिडॉरही आवश्यक -
मेळघाट ते जळगाव जिल्ह्यातील अनेर डॅम वनक्षेत्रापर्यंतचा पाठ‌विलेला टायगर कॉरिडॉरचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच जोडीला वढोदा-मुक्ताईनगर-बोदवड व जामनेरमार्गे गौताळा अभयारण्य जोडण्यासाठी आणखी एका कॉरिडॉरची मागणी जिल्ह्यातील वन्यप्रेमींकडून होत आहे. वाघांच्या संचाराचे हे मार्ग सुरक्षित झाल्यास जिल्ह्यात व्याघ्र संवर्धन सहज शक्य आहे. वाघ एकाच क्षेत्रात राहिला आणि त्याचे जवळच्या नात्यातच प्रजनन झाले, तर जनुकीय बदलांचे आर्वतन घडून दुर्बल पिढी निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून वाघ प्रजननासाठी स्थलांतर करतात. वाघाचा छावा एक ते दीड वर्षाचा झाला की तो आई व भावंडांजवळून वेगळा होतो. तो स्वत:साठी नवे वनक्षेत्र शोधतो. एका वाघाला २० ते ४० किलोमीटरचे वनक्षेत्र लागते. अशा क्षेत्रासाठी तो लांबवर प्रवास करतो. अशा प्रवासासाठी वाघाला नैसर्गिक जंगल मार्गाचा आधार हवा असतो. त्यामुळे व्याघ्र संवर्धन करायचे असेल तर अस्तित्त्वात असलेले नैसर्गिक मार्ग सुरक्षित करणे तसेच नवीन नैसर्गिक संचार मार्ग तयार करणे आवश्यक आहे.

Intro:(जागतिक व्याघ्र संवर्धन दिनानिमित्त आर्टिकल आहे)
जळगाव
जळगाव जिल्हा हा वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात यावल आणि जळगाव हे दोन स्वतंत्र वनपरिक्षेत्र आहेत. यावल वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांमुळे तर जळगाव वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग तसेच उर्वरित पर्वतीय प्रदेशामुळे वन व वन्यजीव वैविध्यतेने संपन्न आहे. जिल्ह्यातील या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांचे अस्तित्त्व आहे. या वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी वन्यजीवप्रेमींची आग्रही मागणी आहे. वन्यजीवप्रेमींच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली पाहिजे. शासनाने देखील याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे.Body:यावल अभयारण्यांतर्गत चोपडा, यावल व रावेर तालुक्याचा काही भाग मोडतो. तर जळगाव अभयारण्यांतर्गत जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव या तालुक्यातील वनक्षेत्र येते. जळगाव वनविभागातील वढोदा वनक्षेत्रात सुरुवातीला वाघाचे अस्तित्त्व आढळून आले. तत्कालीन वनक्षेत्रपाल डी. आर. पाटील यांनी वाघाचे अस्तित्त्व सर्वप्रथम मान्य केले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी २९ जुलै २०११ मध्ये वढोदा वनक्षेत्राला भेट देवून वाघाचे अस्तित्त्व अधोरेखित केले होते. जळगाव जिल्ह्यात वाघ असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन प्रधान वनसचिव यांनी वढोदा व डोलारखेडा वनक्षेत्राला भेट दिली होती. प्रधान वनसचिवांच्या पाहणीत वाघांच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. तेव्हा वढोदा व डोलारखेडा वनक्षेत्रात वाघांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब झाले होते. आज यावल आणि जळगाव वनक्षेत्रात सुमारे ६ ते ७ पट्टेदार वाघ अस्तित्त्वात आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वनविभागाकडून ते जाहीर केले जात नाही. जिल्ह्यात वाघांचे अस्तित्त्व आहे, आनंददायी बाब असली तरी या वाघांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

जळगावातील पर्यावरणप्रेमी अभय उजागरे यांनी जिल्ह्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमींना एकत्र आणून एक चळवळ सुरू केली. त्यापाठोपाठ वन्यजीव संरक्षण संस्था आणि सातपुडा बचाव समितीने देखील ही चळवळ अविरतपणे सुरू ठेवली आहे. २ वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात वसुंधरा महोत्सव पार पडला. या महोत्सवाच्या निमित्ताने जळगावात व्याघ्र परिषद झाली होती. याच परिषदेच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनाचा मुद्दा समोर आला. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही वनक्षेत्रात वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाल्यानंतर वढोदा परिसर व्याघ्र संवर्धन प्रकल्प व्हावा, ही सातपुडा बचाव समितीची आग्रही मागणी होती. यासंदर्भात सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी नंतर तसा आराखडा तयार करून तो वनविभागाकडे पाठवला होता. या प्रकल्पाची 'मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प' या नावाने गॅझेटमध्ये अधिकृपणे नोंद करण्यात आली आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्प म्हणून हे क्षेत्र घोषित झाले आहे. आता या क्षेत्राच्या संवर्धनाचे काम महत्त्वाचे आहे.

'टायगर कॉरिडॉर'ची गरज-

जिल्ह्यातील दोन्ही वनक्षेत्रात वाघांना मुक्त संचार करता यावा, यासाठी टायगर कॉरिडॉर अर्थात व्याघ्र संचार मार्ग तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातपुडा बचाव समितीच्या पाठपुराव्यानुसार मेळघाट अभयारण्य-अंबा बरुआ अभयारण्य-वढोदा वनपरिक्षेत्र-यावल अभयारण्य ते अनेर डॅम वनक्षेत्र असा कॉरिडॉरचा प्रस्ताव जुलै २०१३ मध्ये शासनाला सादर करण्यात आला आहे. यातील सर्वात मोठा टप्पा हा नैसर्गिक कॉरिडॉर आहे. उर्वरित ‌ठिकाणी मात्र, भूसंपादन करून जंगल तयार करावे लागणार आहे. मात्र, शासनाने अद्याप या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. वन्यप्रेमींकडून या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

गौताळा कॉरिडॉरही आवश्यक-

मेळघाट ते जळगाव जिल्ह्यातील अनेर डॅम वनक्षेत्रापर्यंतचा पाठ‌विलेला टायगर कॉरिडॉरचा प्रस्ताव तातडीने मंजूर करुन त्यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच जोडीला वढोदा-मुक्ताईनगर-बोदवड व जामनेरमार्गे गौताळा अभयारण्य जोडण्यासाठी आणखी एका कॉरिडॉरची मागणी जिल्ह्यातील वन्यप्रेमींकडून होत आहे. वाघांच्या संचाराचे हे मार्ग सुरक्षित झाल्यास जिल्ह्यात व्याघ्र संवर्धन सहज शक्य आहे. वाघ जर एकाच क्षेत्रात राहिला आणि त्याचे जवळच्या नात्यातच प्रजनन झाले तर जनुकीय बदलांचे आर्वतन घडून दुर्बल पिढी निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून वाघ प्रजननासाठी स्थलांतर करतात. वाघाचा छावा एक ते दीड वर्षाचा झाला की तो आई व भावंडांजवळून वेगळा होतो. तो स्वत:साठी नवे वनक्षेत्र शोधतो. एका वाघाला २० ते ४० किलोमीटरचे वनक्षेत्र लागते. अशा क्षेत्रासाठी तो लांबवर प्रवास करतो. अशा प्रवासासाठी वाघाला नैसर्गिक जंगल मार्गाचा आधार हवा असतो. त्यामुळे व्याघ्र संवर्धन करायचे असेल तर अस्तित्त्वात असलेले नैसर्गिक मार्ग सुरक्षित करणे तसेच नवीन नैसर्गिक संचार मार्ग तयार करणे आवश्यक आहे.Conclusion:पट्टेदार वाघ झाला बनाना टायगर!

वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या अस्तित्त्वाचे दाखले पूर्वीपासूनच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून जंगलतोड, परदेशी वनस्पतीची झालेली वाढ, जंगलात पुरेशा भक्ष्याचा अभाव व अधिवास शिल्लक नसल्याने जळगाव जिल्ह्यातील वाघ आता केळीच्या शेतांचा आसरा घेत आहेत. जिल्हा हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वाघांना केळीच्या बागांमध्ये असलेला गारवा आकर्षित करतो. वन्यजीव अभ्यासकांच्या मते वढोदा भागात केळीच्या बागांमध्ये वाघाची तिसरी ते चौथी पिढी आज वास्तव्यास आहे. यामुळे या वाघांची ओळख आता 'केळीचा वाघ' अशी होत आहे. केळीसाठी प्रसिधद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातला वाघ देखील आता बागायतदार झाला आहे. या बागायतदार वाघाच्या संवर्धनासाठी या भागातील शेतकऱ्यांना जागृत करण्याची गरज आहे. व्याघ्र संवर्धनासाठी लोकसहभाग मिळविणे तसेच शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्था करीत आहे. गेल्या ९ वर्षांपासून या संस्थेकडून जळगाव वन विभागाच्या सहकार्याने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दरवर्षी २८ व २९ जुलै रोजी टायगर रॅली काढली जाते. यावर्षी या रॅलीचे नववे वर्ष होते. जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी 'वाघ वाचवा' हा संदेश देत वढोदा येथे जातात. २ दिवस त्या भागात वाघ वाचविण्याबाबत जनजागृती करतात. जिल्ह्यातील वन्य व पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल्या वाघ वाचविण्याच्या या चळवळीला लोकसहभाग व राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर जगण्यासाठी धडपड करणाऱ्या जिल्ह्यातील बागायदार वाघाचे अस्तित्त्व टिकून राहील, यात शंका नाही.
Last Updated : Jul 29, 2019, 11:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.