ETV Bharat / state

वाळू चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल, ओमनीतून अवैध वाळू वाहतूक - जळगाव अवैध वाळू वाहतूक

वाळू चोरटे आता अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरने न करता ओमनी कारमधून करत आहेत. जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी मध्यरात्रीनंतर गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या 2 ओमनी कार पकडल्या.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Aug 18, 2020, 2:10 PM IST

जळगाव - वाळू चोरट्यांनी महसूल प्रशासनाला अक्षरशः जेरीस आणले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या गस्ती पथकांना चकवा देण्यासाठी जळगावातील काही वाळू चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कारवाई टाळण्यासाठी वाळू चोरटे आता अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरने न करता ओमनी कारमधून करत आहेत. जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी मध्यरात्रीनंतर गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या 2 ओमनी कार पकडल्या. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जळगाव
जळगाव

चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने मेहुणबारे येथील मंडळ अधिकारी गणेश लोखंडे, वडगाव लांबे येथील तलाठी डी. एस. काळे, तळेगाव येथील तलाठी राज डोंगरदिवे आदींचे पथक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. मेहुणबारे मंडळात गस्त सुरू असताना पथकाला एक काळ्या रंगाची ओमनी (एम.एच. 19 वाय 0427) व विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ओमनी कारमध्ये गिरणा नदीपात्रातून चोरलेली वाळू गोण्यांमध्ये भरून वाहतूक करताना मिळून आल्या. पथकातील अधिकाऱ्यांनी ओमनी चालकांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना वाहनांसह मेहुणबारे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बाला दगा मोरे (रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव) व नाना विलास राठोड (रा. करगाव, ता. चाळीसगाव) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : मेळघाटाला लागलेला कुपोषणाचा बट्टा 28 वर्ष उलटूनही कायमच..!

दरम्यान, मेहुणबारे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असून, चाळीसगाव शहरात देखील रात्रीच्या सुमारास अनेक वाळूचे ट्रॅक्टर भरून येतात. बांधकामांवर सर्रासपणे वाळू खाली होत आहे. याकडेही महसूल पथकाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.