ETV Bharat / state

कुत्र्याने तोडला प्रौढाच्या चेहऱ्याचा लचका... उपचारासाठी रुग्णाची चार तास फरफट - जळगाव कुत्रा चावला बातमी

जळगावातील हरिविठ्ठलनगर जवळील बजरंग सोसायटी शेजारी राहणारे अशोक वाणी या व्यक्तीला पिसाळलेला कुत्रा चावला. वाणी हे घराबाहेर बसलेले असताना, पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर एकदम हल्ला केला.

old-man-was-bitten-by-dog-in-jalgoan
कुत्र्याने तोडला प्रौढाच्या चेहऱ्याचा लचका...
author img

By

Published : Jul 14, 2020, 5:09 PM IST

जळगाव - शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका नागरिकाच्या चेहऱ्याचा लचका तोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. गंभीर जखमी अवस्थेत या प्रौढाला उपचारासाठी फिरफिर करावी लागली. सुरुवातीला एकही सरकारी किंवा खासगी रुग्णालय जखमी प्रौढाला उपचारासाठी दाखल करून घेत नव्हते. त्यामुळे त्यांची तीन ते चार तास फरफट झाली. अखेर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यात आले.

जळगावातील हरिविठ्ठलनगर जवळील बजरंग सोसायटी शेजारी राहणारे अशोक वाणी या व्यक्तीला पिसाळलेला कुत्रा चावला. वाणी हे घराबाहेर बसलेले असताना, पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर एकदम हल्ला केला. वाणी यांच्या तोंडाच्या डावा भागाचा पूर्णपणे कुत्र्याने लचका तोडला. कुत्र्याने वाणी यांच्यासह आणखी एका जणाच्या पायावर चावा घेऊन लचका तोडला. ही घटना घडली, तेव्हा घरात अशोक वाणी व त्यांच्या पत्नी असे दोघेच होते.

त्यांची दोन्ही मुले पुणे येथे कामानिमित्त आहेत. त्यामुळे शेजारी राहणारे रिक्षाचालक योगेश पाटील यांनी त्यांना तत्काळ रिक्षात बसवून शिवाजीनगरातील महापालिकेच्या रुग्णालयात नेले. या ठिकाणी त्यांना दोन इंजेक्शन देण्यात आली. मात्र, त्यांना दाखल करण्यात आले नाही.

त्यानंतर त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी सर्व बेड कोविडचे आहेत. कोविड व्यतिरिक्त दुसरे रुग्ण घेतले जात नाहीत, असे सांगत गेटवरूनच त्यांना परतवून सिव्हिलला जा, असे सांगण्यात आले. म्हणून नातेवाईकांनी त्यांना पुन्हा सिव्हिलला हलविले. जिल्हा रुग्णालयात कोविड असल्याचे सांगत त्यांना तासभर कसलेच उपचार मिळाले नव्हते. अखेर अनेक रुग्णालये फिरून पुन्हा सिव्हिलला अर्थात कोविड रुग्णालयातच दाखल करून घेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.