ETV Bharat / state

एकनाथ खडसेंना 'ईडी'ने नोटीस बजावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस दिली आहे. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात ही नोटीस आहे. मात्र, हा सर्व प्रकार सुडाच्या राजकारणासाठी भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. एकनाथ खडसे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ईडी लावली तर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते.

ncp in jalgaon
एकनाथ खडसेंना 'ईडी'ने नोटीस बजावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
author img

By

Published : Dec 27, 2020, 12:26 PM IST

Updated : Dec 27, 2020, 12:31 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात असून, खडसेंना आलेली ईडीची नोटीस हा त्यातलाच एक भाग आहे, असा आरोप करत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी पक्ष कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. 30 डिसेंबर रोजी त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीकामी उपस्थित रहावे लागणार आहे. ही बाब स्वतः खडसेंनी काल (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकत्र येत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी उपस्थित होते.

भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी-

यावेळी भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'मोदी सरकार हाय हाय', 'ईडी झाली येडी', 'भाजप सरकारचा निषेध असो', अशा घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.

भाजप सुडाचे राजकारण करतेय- अभिषेक पाटील

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत असून, हे खपवून घेणार नाही. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहाराची यापूर्वी एसीबी, अँटी करप्शन तसेच झोटिंग समितीने सखोल चौकशी करून खडसेंना क्लीनचिट दिली आहे, असे असताना आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही. ईडीने खडसेंना काढलेली नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला.

Last Updated : Dec 27, 2020, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.