जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटर हँडलवर ट्वीट करून दिली आहे. दरम्यान, खडसेंना यापूर्वीही कोरोना झाला होता. तेव्हा ते उपचार घेऊन कोरोनातून बरे झाले होते. आता त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.
एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच विलगीकरणात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.
ट्वीटरवरून दिली माहिती-
एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून, माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो', असे आवाहन खडसेंनी ट्वीट करत केले आहे.
हेही वाचा- राज्यात पुन्हा टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता - अजित पवार