ETV Bharat / state

'शरद पवार इज अ पॉवर'; एकनाथ खडसेंनी उधळली स्तुतीसुमने - जळगाव माजीमंत्री एकनाथ खडसे

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी भाषण करताना खडसे बोलत होते.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Dec 2, 2020, 6:59 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही. 'शरद पवार इज अ पॉवर', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसेंनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला बाजूला ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार सत्तेत आणले. अटलजींनी तर 32 पक्षांचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेक पक्षांचे सरकार सांभाळले होते. तर मग तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार का सक्षमपणे चालणार नाही, असे सांगत खडसेंनी हे सरकार कोसळणार नाही, असेही सांगितले.

जळगाव

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी भाषण करताना खडसे बोलत होते. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून केलेल्या आपल्या पहिल्या भाषणातच खडसेंनी भाजपला लक्ष करत चांगलेच चिमटे काढले. बैठकीला माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, दिलीप सोनवणे, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडसे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला कारण...

शरद पवारांचे मी आभार मानतो. मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की, तुम्ही राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला? भाजप मी सोडली नाही, तर मला भाजपने अक्षरशः बाहेर ढकलले. मागच्या काळात भाजपमध्ये माझा खूपच अपमान झाला. मला डावलले गेले. भाजपने मला पक्ष सोडायला भाग पाडले. अशा परिस्थितीत बहुजन समाजाला खऱ्या न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. तुमच्यापेक्षा मला अधिक समजत म्हणून तर राष्ट्रवादीत आलो ना, असा टोलाही खडसेंनी भाजप नेत्यांना लगावला.

शरद पवारांवर उधळली स्तुतीसुमने!

आपल्या भाषणात एकनाथ खडसेंनी शरद पवारांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळली. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही. 'पवार इज अ पॉवर'. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना मैलाचे दगड ठरतील, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, असेही खडसे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पडणार, हे भाजपचे दिवास्वप्न-

महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे अशक्यप्राय वाटणारे काम शरद पवारांनी केले. हे कधीही न होण्यासारखे काम होते. ते पवारांनी शक्य केले. भाजपला बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. आज ना उद्या सरकार पडेल, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. पण वर्ष झाले अजून तसे काहीही घडलेले नाही. सत्तेत येण्यासाठी भाजपला एका विशिष्ट पक्षाचे पूर्ण समर्थन हवे आहे. एखादा पक्ष तिकडे गेल्याशिवाय भाजपचे सरकार येऊच शकत नाही. उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री पदावर काम करतील का? नाही ना, मग शिवसेना तिकडे भाजपसोबत जाणारच नाही. काँग्रेस तर उभ्या हयातीत भाजपसोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा विषयच नाही. एकदा भाजपने राष्ट्रवादीलासोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण काय झाले? याचा त्यांना चांगला अनुभव आहे, असा चिमटा खडसेंनी यावेळी सरकार कोसळण्याच्या मुद्द्यावर बोलताना भाजपला काढला. भाजप आपले आमदार सांभाळण्यासाठी हे सरकार पडणार असल्याचे उद्योग करत आहे. मी तिकडे भाजपत असताना असे उद्योग केले आहेत. आमदार सांभाळण्यासाठी तसे करावेच लागते. लाल दिव्याची गाड्या 50 आणि आश्वासने 200 अशी ही परिस्थिती असल्याची कोपरखळीही खडसेंनी हाणली.

अटलजींनी तर महाट्रक चालवला होता...

महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षाचे रिक्षा सरकार म्हणून भाजपचे नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. मग अटलजींनी तर 32 पक्षांचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते. तर मग तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार का सक्षमपणे चालणार नाही, असेही खडसेंनी सांगितले.

फडणवीसांना लगावला जोरदार टोला -

चिंता करू नका महाविकास सरकार पडणार नाही. अहंमपणा ज्याठिकाणी येतो त्याठिकाणी पक्षाचे वाटोळे होते, असे सांगत खडसेंनी नाव न घेता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. नेतेमंडळी जास्त आणि कार्यकर्ते कमी अशी परिस्थिती निर्माण झाली की कोणत्याही पक्ष वाढीला मर्यादा येतात. संघटितपणे काम केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही, मग नाथाभाऊ पण काहीही करू शकणार नाही. अनावधानाने चूक झाली तर दुर्लक्ष करा. झोकून देऊन काम करा. पक्ष निश्चित वाढेल. पैसा, वादविवाद गौण आहे. कार्यकर्ते उभे करा, आपोआप पक्ष संघटन बळकट होईल. या माध्यमातून आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. सरकार आपले आहे, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचवा, या पद्धतीने आपल्याला पुढे काम करायचे आहे, असा सल्ला खडसेंनी कार्यकर्त्यांना दिला.

बीएचआर प्रकरणी आकस बुद्धीने कारवाई नाही -

बीएचआर पतसंस्थेचे गैरव्यवहार प्रकरण तत्कालीन सरकारने दडपले होते. आता आधीच्या सरकारच्या सूचनेनुसारच कारवाई होत आहे. त्यात नव्याने काहीही झालेले नाही. बीएचआर हे प्रकरण गोरगरिबांशी निगडित आहे. यात गोरगरिबांना न्याय मिळाला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आयुष्यभर सोडणार नाहीत. म्हणून हे गृहीत धरून काम करायचे आहे. मात्र, आकस बुद्धीने काम करू नका, असेही खडसेंनी सांगितले.

जिकडे पाहावं तिकडे शरद पवार असे चित्र निर्माण करू या-

शरद पवारांचा वाढदिवस येत आहे, हा वाढदिवस इतक्या उत्साहात साजरा करा की, विरोधक पाहत राहिले पाहिजे. जिकडे पाहावं तिकडे शरद पवार असे चित्र निर्माण करूया. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तो पक्ष पुढे जातो, असे कार्यक्रम पक्ष वाढीसाठी निमित्त असतात. कोणत्याही प्रकारची गोष्ट असेल तर तिचा फायदा उचला. नेत्यांचा वाढदिवस आम्ही याच पद्धतीने साजरे केले. सरकारच्या चांगल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. त्याने खूप फरक पडतो. याच पद्धतीने काम करूया. मला रुळायला फार वेळ लागत नाही. मला पद वगैरेची अपेक्षा नाही. माझा छळ झाला आहे, हेच फक्त माझ्या लक्षात आहे. माझा तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. तळागाळातील कार्यकर्ते आपल्याकडे कमी आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.