ETV Bharat / state

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून पक्षप्रवेशाचे आमंत्रण! - ncp sharad pawar

भाजप नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. मात्र असे असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादीचे पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यासाठी राष्ट्रवादीला एकनाथ खडसेंसारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. त्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादीत यावे असं या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

'NCP' invited to Eknath Khadse
एकनाथ खडसेंना पक्षप्रवेशाचे आमंत्रण!
author img

By

Published : Oct 16, 2020, 11:26 AM IST

जळगाव - भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. मात्र असे असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरला एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन, त्यांना थेट पक्ष प्रवेशाचे जाहीरपणे आमंत्रण दिले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेले पक्ष प्रवेशाचे आमंत्रण एकनाथ खडसे यांनी हसत-हसत स्वीकारले. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अमित पाटील, माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संजय चव्हाण, अजय बढे आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत यावे, अशी विनंती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान राष्ट्रवादीचे पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यासाठी राष्ट्रवादीला एकनाथ खडसेंसारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. त्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादीत यावे असं या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.