ETV Bharat / state

पाच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी काय केले- शरद पवार

राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, अशी घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी समाचार घेतला.

शरद पवार
author img

By

Published : Oct 9, 2019, 1:28 PM IST

जळगाव - राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, अशी घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी समाचार घेतला. पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना काय केले? तसेच सत्तेत असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का नाही केला. जळगाव येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार जळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना

हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही

पवार म्हणाले, सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, गेल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी काय केले? त्यावेळी का नाही केला केला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? पाच वर्षाच्या सत्ताकाळात केलेल्या कामाची माहिती त्यांनी लोकांना द्यावी. असे सांगितले तरच लोक त्याकडे लक्ष देणार आहेत. अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला नसलेला भाव, राज्यातील विकास या प्रश्‍नाकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात या सरकारने कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत, असेही पवार यावेळी म्हणाले.

मी घरी जाऊन माझा सातबारा पाहतो -

माझी पण शेती आहे. मी घरी जाऊन माझा सातबारा पाहतो, तो कोरा झाला आहे का? याची खात्री करतो, या शब्दांत पवारांनी उद्धव ठाकरेंच्या घोषणेची खिल्ली उडवली.

हेही वाचा - काँग्रेसच्या प्रचारात 'तन मन धन'से उतरणार मनसे, 'या' कार्यकर्त्यांनी घेतला निर्णय

Intro:जळगाव
राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना काय केले? असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जळगावात सेनेला काढला.Body:जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, गेल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी काय केले? त्यावेळी का नाही केला केला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? पाच वर्षाच्या सत्ताकाळात केलेल्या कामाची माहिती देवून त्यात अधिकचे काय करायचे, हे सांगितले तरच लोक त्याकडे लक्ष देतात. अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला नसलेला भाव, राज्यातील विकास या प्रश्‍नाकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात या सरकारने कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.Conclusion:मी घरी जाऊन माझा सातबारा पाहतो-

माझी पण शेती आहे. मी घरी जाऊन माझा सातबारा पाहतो, तो कोरा झाला आहे का? याची खात्री करतो, या शब्दांत पवारांनी उद्धव ठाकरेंच्या घोषणेची खिल्ली उडवली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.