ETV Bharat / state

महागाईविरोधात जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन - NCP agitates against inflation in Jalgaon

वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेट्रोल-डिझेल, रासायनिक खते तसेच बियाण्यांच्या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहत इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

महागाईविरोधात जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन

author img

By

Published : May 17, 2021, 3:51 PM IST

जळगाव - वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेट्रोल-डिझेल, रासायनिक खते तसेच बियाण्यांच्या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहत इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयासह पेट्रोल पंपावर जाऊन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वाल्मिक पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, मंगला पाटील आदी सहभागी झाले होते.

महागाईविरोधात जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन

'वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हवालदिल'

या आंदोलनाची भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील म्हणाले की, भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे महागाई भडकली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता अक्षरशः हैराण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. विरोधी पक्षात असताना भाजपाकडून इंधन दरवाढीच्या विरोधात आकालतांडव केले जात होते. पण आता ते केंद्रात सत्तेत असताना वाढत्या महागाईबद्दल अवाक्षर काढायला तयार नाहीत. 'अच्छे दिन'च्या नावाखाली जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. इंधनाचे दर सतत वाढत असल्याने महागाई भडकली आहे. आता तर केंद्र सरकारने खते व बियाण्यांच्या किमती दुपटीने वाढवल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आता खरीप हंगामाची तयारी सुरू असताना खते व बियाण्यांची किंमत वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. केंद्र सरकारने वाढती महागाई थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

'हेच का अच्छे दिन?'

केंद्र सरकार सातत्याने इंधनाचे दर वाढवत आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. भाजपाने लोकांना अच्छे दिनचे जे आश्वासन दिले होते, ते हेच का? असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोल पंपावर राष्ट्रवादीची गांधीगिरी

इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन, इंधन भरण्यासाठी आलेल्या दुचाकी चालकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली. केंद्र सरकारने हे अच्छे दिन आणले आहेत, असा उपरोधिक टोला यावेळी लगावण्यात आला.

हेही वाचा - मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, वाहतूक सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.