ETV Bharat / state

जळगावात गुन्हेगार तरुणाचा खून; काही दिवसांपूर्वीच जामिनावर आला होता बाहेर

author img

By

Published : Jan 25, 2021, 9:21 AM IST

जळगावमध्ये काल (रविवारी) रात्री एका गुन्हेगार तरुणाचा खून झाला. मद्यपान करताना वाद होऊन हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Death
मृत

जळगाव - काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. जळगाव शहरातील शाहू नगरातील 'जळकी मील' परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमागचे कारण मात्र, समोर आलेले नाही. मद्यपान करताना वाद झाल्याने ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

शेख अल्तमश शेख शकील उर्फ सत्या (वय 20, रा. इंदिरानगर, जळगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्तमश हा काही दिवसांपूर्वीच एका टपरी चालकावर चाकू हल्ला केल्याच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेला होता. दरम्यान, या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकाला दिसला मृतदेह -

रात्री 10 वाजेच्या सुमारास जळकी मील परिसरात अल्तमश हा रक्तबंबाळ अवस्थेत एका सुरक्षा रक्षकाला दिसला. त्याने त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अल्तमश याला जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मद्यपान करताना वाद झाल्याचा अंदाज -

जळकी मील परिसरात अल्तमश हा काही जणांसोबत मद्यपान करत होता. त्यावेळी आपापसात वाद होऊन हाणामारी झाली असावी, त्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अल्तमश याच्या डोक्यात फरशीने मारल्याचे दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.