ETV Bharat / state

भुसावळ शहर पुन्हा हादरले; चाकूने वार करत तरुणाचा निर्घृण खून - जळगाव खून बातमी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका तरुणाचा चाकूने वार करत निर्घृण खून झाल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2021, 4:35 PM IST

Updated : May 8, 2021, 5:28 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. शुक्रवारी (दि. 7 मे) रात्रीच्या सुमारास एका तरुणाचा चाकूने वार करत निर्घृण खून झाला आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

माहिती देताना पोलीस अधिकारी

सुनील अरुण इंगळे (वय 34 वर्षे, रा. भुसावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ शहरात एका तरुणाचा रात्री खून झाल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्या अनुषंगाने भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी मृतावस्थेत असलेली व्यक्ती ही सुनील इंगळे असल्याची माहिती समोर आली.

मित्राने खून केल्याचा संशय

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासात संशयित आरोपी म्हणून शहाबाज शाह याला ताब्यात घेतले आहे. शाह हा सुनील याचा मित्र होता. दोघेही कायम एकमेकांसोबत असायचे. दोघांमध्ये काहीतरी वाद झाला असावा, त्यात घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. पोलीस पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम करत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.

हेही वाचा - World Red Cross Day Special : मानवी दुःखाचा परिहार करणारी 'रक्तदान चळवळ'

Last Updated : May 8, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.