ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारमधील मंडळी विदूषकी चाळे करण्यात मश्गूल - सदाभाऊ खोत - ठाकरे सरकार

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विनोदवीर मला बघायला मिळत आहेत. ते दररोज नवनवीन विनोदी वक्तव्य करून महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करत आहेत. सरकारमधील मंडळी जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदूषकी चाळे करण्यातच मश्गूल झाली आहे, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोमवारी (दि. 27 सप्टेंबर) जळगावात राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
author img

By

Published : Sep 27, 2021, 4:35 PM IST

Updated : Sep 27, 2021, 4:54 PM IST

जळगाव - महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विनोदवीर मला बघायला मिळत आहेत. ते दररोज नवनवीन विनोदी वक्तव्य करून महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करत आहेत. सरकारमधील मंडळी जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदूषकी चाळे करण्यातच मश्गूल झाली आहे, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोमवारी (दि. 27 सप्टेंबर) जळगावात राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. महापूर व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन 3 पट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

बोलताना आमदार सदाभाऊ खोत

राज्य सरकारच्या पंचायत राज समितीच्या दौऱ्यानिमित्ताने सदाभाऊ खोत हे जळगावात आलेले आहेत. जिल्हा परिषदेत आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारची वाटचाल, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, आजचे भारत बंद आंदोलन अशा विषयांवर त्यांनी मते मांडली.

ठाकरे सरकारवर डागले टीकास्त्र

सदाभाऊ खोत म्हणाले, अलीकडच्या काळात दादा कोंडके यांच्यानंतर मराठी सिनेमातील विनोद कुठेतरी हद्दपार झाला होता. पण, महाविकास आघाडी सरकारमध्ये मला अनेक विनोदवीर पाहायला मिळताय. ते दररोज वेगळा विनोद करून महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करत आहेत. एका बाजूला राज्यात दोनवेळा चक्रीवादळ आले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोकणात शेतकरी आणि मच्छीमार संकटात सापडला. उत्तर महाराष्ट्रात केळी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण, सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करण्याची नुसती घोषणा केली. प्रत्यक्षात कुणालाही मदत मिळाली नाही. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज माफी द्यावी, 2019 मध्ये फडणवीस सरकारने महापूरग्रस्त शेतकऱ्यांना 100 टक्के पीककर्ज माफ केले होते. तुमच्यात हिंमत असेल तर अतिवृष्टी, चक्रीवादळातील शेतकऱ्यांना पीककर्ज माफी द्या. नुकसान भरपाई देताना ती एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन 3 पट द्यावी, अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली.

खासदार संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा

यावेळी सदभाऊ खोत यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. राऊत हे दररोज विनोदवीरासारखे बॅटिंग करतात. त्यांना मला सांगायचे आहे की, महाभारतातील संजयला रणभूमीवरील युद्ध दिसत होते. त्यावरून तो निर्णय घेत होता. पण, या संजयला मात्र वसुलीचा दृष्टांत पडत आहे. त्यांना जमिनीवरचा विसर पडल्याचे चित्र आहे, असेही ते म्हणाले.

भारत बंद आंदोलन फसले

केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांविरुद्ध आज होणाऱ्या भारत बंद आंदोलनाचीही सदाभाऊ खोत यांनी खिल्ली उडवली. आजचे आंदोलन पूर्णपणे फसले आहे. मी 5 ते 6 जिल्ह्यातून प्रवास करून आज जळगावात आलो. पण, मला कुठेही भारत बंद आंदोलनाचा परिणाम दिसला नाही. गेली 70 वर्षे बाजार समितीच्या माध्यमातून एकाधिकारशाहीने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले. एकाधिकारशाहीतून जर शेतकऱ्यांची सुटका होत असेल, एक देश-एक बाजारपेठ हे सूत्र अंमलात आणले जात असेल तर या देशातील शेतकरी त्याचे स्वागत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही काय मार्केट कमिटीचे वळू पोसायला जन्माला आलेलो नाहीत

आमच्या बापाने पिकवलेला शेतमाल कोणाला विकावा, याचा अधिकार आमच्या बापाला असावा. प्रक्रिया केलेला शेतमाल उद्योजकाने कुठेही विकायचा आणि आमच्या बापाने मात्र त्याने पिकवलेला शेतमाल सरकार सांगेल तिथेच विकायचा? म्हणजे आम्ही काय बाजार समितीचे वळू पोसायला जन्माला आलेलो नाहीत. 70 वर्षांच्या काळात आम्ही तुमची व्यवस्था बघितली. या व्यवस्थेमुळे 4 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मग आज जर आमच्या क्षेत्रात खुली अर्थव्यवस्था येत असेल, भांडवल गुंतवणूक होत असेल तर प्रक्रिया उद्योग उभे राहून शेतकऱ्याचा शिकलेला पोरगा उद्योजक होत असेल तर आम्ही या कायद्यांचे स्वागत करू. पहिल्यांदा कायद्याची अंमलबजावणी तर होऊ द्या, मूल जन्माला येण्याआधीच ते पांगळे असेल, आंधळे असेल, असे सांगताय. तुम्ही काय ज्योतिष आहात का?, असा सवालही त्यांनी उपस्थित करत, शेतीच्या बाबतीतला निर्णय शेतकऱ्याला घेऊ द्या, तुमच्या राजकारणासाठी शेतकऱ्याचा बळी देऊ नका, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - जळगावात 'भारत बंद' संमिश्र प्रतिसाद; काँग्रेस-राष्ट्रवादीने सक्तीने केली दुकाने बंद

Last Updated : Sep 27, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.