ETV Bharat / state

चाळीसगाव गांजा अन् गुटख्याचे हब, आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप

मेहूणबारे पोलिसांच्या हद्दीतून गुटख्याचा ट्रक जात होता. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला. याबाबत तक्रार देण्यासाठी गेल्यास पोलिसांनी हुज्जत घालत माझी तक्रारी घेतली नाही. याची दाद मी उच्च न्यायालयात मागणार, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.

आमदार मंगेश चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण
author img

By

Published : Oct 17, 2020, 8:20 PM IST

जळगाव - चाळीसगाव हे गांजा अन् गुटख्याचे हब आहे. चाळीसगावमधून गुटखा, गांजा राज्यात पुरविला जातो. पोलिसांचा आर्शीवाद अवैध व्यावसायिकांना असल्याने अवैध व्यवासायिकांवर कारवाई पोलीस करत नाहीत. शुक्रवारी (दि. 16 ऑक्टोबर) मेहूणबारे पोलिसांच्या हद्दीतून ट्रक भरुन गुटखा गेला. मी त्या गाडीचा पाठलाग करत असल्याने पोलिसांनी गुटख्याचा ट्रक जप्त केला. रात्री आठ वाजता पकडलेला ट्रक सकाळी आठपर्यंत जळगावला येऊ शकला नाही. यावरून पोलीस व अवैध व्यवासायिकांचे संबंध कसे आहेत, हे लक्षात येते. आमदार या नात्याने मी तक्रारदार होतो पण माझी पोलिसांनी तक्रार घेतली नाही. याबाबत उच्च न्यायालयात मी दाद मागणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आमदार चव्हाण म्हणाले, मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पन्नास लाखांचा गुटखा घेवून जाणारा ट्रक (एमएच 18 एम 0553) पकडला. या ट्रकमधील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता सोडला. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना तसेच जिल्हापेठ पोलीस निरीक्षक पटेल यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तीन तास वाद चालल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनंतर अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला.

पोलिसांचे चाळीसगावमधील अवैध व्यवासायिकांना अभय आहे. युवा पिढी गुटखा, गांजाच्या विळख्यात अडकत आहे. मी त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पोलीस अवैध व्यवासायिकांना पाठीशी घालत आहे. मी दिलेली तक्रारही घेतली नाही. लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.

हेही वाचा - बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.