ETV Bharat / state

खडसेंना मिळाले महाजनांचे बळ! म्हणाले, ते आमदार झाले तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करू

'पक्षाने मला विधानपरिषदेवर संधी दिली पाहिजे', अशी मागणी करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन आता पुढे सरसावले आहेत.

mla girish mahajan and eknath khadase
गिरीश महाजन एकनाथ खडसे
author img

By

Published : May 5, 2020, 7:35 PM IST

जळगाव - एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय हाडवैर जगजाहीर आहे. अशातच महाजन यांनी खडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'एकनाथ खडसे यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. विरोधी पक्षनेता तसेच मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली तर आम्हाला विरोधीपक्ष म्हणून चांगले काम करता येईल', अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया....

जळगावातील जीएम फाउंडेशन आणि निरामय सेवा संस्था यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाला 5 व्हेंटिलेटर्स प्रदान करण्यात आले, याप्रसंगी महाजन बोलत होते. कोरोनाचा जिल्ह्यातील प्रसार, शासनाने राज्यात मद्यविक्रीला दिलेली सशर्त परवानगी, अशा मुद्द्यांवर त्यांनी यावेळी मात्र मांडली. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या उमेदवारीच्या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीची संधी मिळाली तर निश्चितच फायदा होणार आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. मंत्री म्हणून त्यांना चांगला अनुभव आहे. राजकीय क्षेत्राचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना तिकीट मिळाले तर आम्हाला विरोधी पक्ष म्हणून अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा... पाण्याअभावी 'त्याचा' रस्त्यावरच तडफडून मृत्यू, कोरोनाच्या भीतीने कोणी जवळही गेले नाही

मद्यविक्रीच्या शासन निर्णयावर नाराजी...

शासनाने राज्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयावर महाजन यांनी नाराजी दर्शवली. मद्यविक्रीच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. पोलिसांनाही गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले आहे. अशात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्याची भीती आहे. कर मिळाला पाहिजे, हे ठीक आहे. पण शासनाने मद्यविक्रीबाबत काहीतरी वेगळा तोडगा काढण्याची गरज आहे. मद्यविक्रीच्या दुकानांवर गर्दी कशी होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत. यात कोरोनाचा संसर्ग वाढला तर ते आपल्याला परवडणारे नाही, असेही महाजन म्हणाले.

जिल्हा रुग्णालयाला दिले 5 व्हेंटिलेटर्स

जीएम फाउंडेशन आणि निरामय सेवा संस्था यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाला 5 व्हेंटिलेटर्स प्रदान करण्यात आले. गिरीश महाजन यांच्या हस्ते व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरेंना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर महाजन यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुरेश भोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.