जळगाव - शरद पवारांवर अभिनेत्री केतकी चितळेने केलेली पोस्ट ( Jitendra Awhad on Ketki Chitale post ) म्हणजे विकृत मानसिकता आहे. स्त्रीत्वाच्या आड लपून विष ओकणारी ही प्रवृत्ती आहे. अतिशय गलिच्छ अशी ही ( Ketki Chitale post news ) विषवल्ली असून ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे. केतकीला धडा शिकवणारच या शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यावर पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.
हेही वाचा - Five Died In Road Accident : जळगावात पाच वाहनांचा भीषण अपघात.. पाच जण जागीच ठार
जळगावातील एका विवाह सोहळ्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्त्रीत्वाच्या मागे लपून अशा पद्धतीने विष ओकणे हे एका महिलेला शोभत नाही. एखादी स्त्री असे बोलू शकते यावर विश्वासच बसत नाही. किमान तिच्यावर आई वडिलांनी तरी संस्कार करायला हवे होते. ही विचारांची विषवल्ली आहे. महिला असली तरी तिला माफ करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे, अभिनेत्री केतकी चितळेला धडा शिकवणार या शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
केतकी चितळेच्या पोस्ट मागे कोणाचा काही हात आहे का ? याबाबत विचारले असता, यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज ठाकरे इतर कुणी असतील. आम्ही त्यांच्यावर बोलतो ते आमच्यावर बोलतात, मात्र इतके किळसवाणे कुणी बोलत नाही. आम्ही जे बोलतो ते वैचारिक असते. शरद पवार हे काय व्यक्तिमत्त्व आहे हे केतकी चितळेला काय कळणार, असे मंत्री आव्हाड यावेळी म्हणाले.