ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: येणाऱ्या काळात 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल' - गुलाबराव पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी येणाऱ्या काळात दुध का दूध, पाणी का पाणी होईल असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये एका ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते.

minister-gulabrao-patil-reacted-to-sanjay-rathores-resignation
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: येणाऱ्या काळात 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल' - गुलाबराव पाटील
author img

By

Published : Feb 16, 2021, 3:26 PM IST

जळगाव - शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची मला आताच माहिती मिळाली. त्यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात घेतले जात असल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा पक्षाकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. येणाऱ्या काळात या प्रकरणाच्या चौकशीत 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल', असे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: येणाऱ्या काळात 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल' - गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील हे मंगळवारी जळगावात होते. एका ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते? त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतीलच. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात काय निष्पन्न होते, ते पाहणे महत्त्वाचे असेल. तपासाआधीच आपण कोणाला शिक्षा करू शकत नाही. तपासात जर काही निष्पन्न झाले तर गुलाबराव पाटीलच नव्हे तर कुणालाही बोलण्याची गरज राहणार नाही. आपोआप गुन्हा दाखल होईल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

युतीच्या काळातही तीन मंत्र्यांनी दिले होते राजीनामे -

मागच्या कालखंडात युती सरकारच्या काळात तीन मंत्र्यांवर अशाच प्रकारचे आरोप झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव असल्याने त्यांनी संजय राठोड यांना राजीनामा द्यायला लावला असावा, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक, सायबर सेलकडे तक्रार -

मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केले आहे. याबाबत त्यांनी स्वतः काल रात्री पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.