ETV Bharat / state

आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपाकडे आलो -गुलाबराव पाटील - भाजपा

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी धक्कादायक विधान केलं. आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. असं गुलाबराव म्हणाले.

gulabrao
आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपाकडे आलो -गुलाबराव पाटील
author img

By

Published : Nov 19, 2022, 10:55 PM IST

जळगाव: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी धक्कादायक विधान केलं. आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. असं गुलाबराव म्हणाले. साधं सरपंच पद कोणी सोडत नाही. मात्र, आम्ही आठ जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची जर संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असती असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमाप्रसंगी केले आहे.

आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपाकडे आलो -गुलाबराव पाटील

दरम्यान उठावासाठी 38 आमदार लागणार होते व मी 33 वा होतो जर पाच आमदार आले नसते तर माझा देखील कार्यक्रम आटोपला असता असे देखील यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर 22 आमदारांसह मी उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो होतो. मात्र, त्यावेळी त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी आम्हाला "दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे" असं म्हणून आम्हाला डिवचलं.

असे वक्तव्य करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो असल्याचे ही गुलाबराव पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.