ETV Bharat / state

व्याधीग्रस्त मुलीवर मांत्रिकाचे अघोरी उपचार, चप्पल तोंडात धरून गावभर फिरवले

author img

By

Published : Jul 20, 2020, 4:44 PM IST

Updated : Jul 20, 2020, 10:19 PM IST

जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या शेंगोळा गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मांत्रिकाने शारीरिक व्याधीने ग्रस्त असलेल्या एका 22 वर्षीय मुलीवर अघोरी उपचार केले आहेत. अंगात चुडेल घुसली असून, तिला बाहेर काढण्याच्या नावाखाली तोंडात चप्पल धरायला लावून मुलीला गावभर फिरवले आहे.

mantrik Improper treatment of a girl suffering from a physical ailment in jalgaon
धक्कादायक! शारीरिक व्याधीने ग्रस्त असलेल्या मुलीवर मांत्रिकाकडून अघोरी उपचार

जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या शेंगोळा गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मांत्रिकाने शारीरिक व्याधीने ग्रस्त असलेल्या 22 वर्षीय मुलीवर अघोरी उपचार केले आहेत. अंगात चुडेल घुसली असून, तिला बाहेर काढण्याच्या नावाखाली तोंडात चप्पल धरायला लावून मुलीला गावभर फिरवले आहे. या प्रकाराची कुणकुण लागताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी धाव घेत संबंधित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे समुपदेशन करत मुलीवर वैद्यकीय उपचार करण्यास राजी केले.

शेंगोळा येथील एका कुटुंबातील मुलगी अनेक दिवसांपासून शारीरिक व्याधीने ग्रस्त होती. पालकांनी तिच्यावर अनेक औषध उपचार केले. पण गुण येत नव्हता. मुलीला बाहेरची बाधा असल्याचा चुकीचा सल्ला नजीकच्या नातेवाईकांनी मुलीच्या परिवाराला दिला. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील एका मांत्रिकास बोलावले. त्या मांत्रिकाने मुलीवर अघोरी उपचार केले. मुलीला तोंडात पायातील चप्पल धरायला लावून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात फिरवले. अशा प्रकारे मुलीला हीन वागणूक देवून मुलीवर अघोरी उपचार करण्यात आले. मांत्रिकाने मुलीच्या अंगातील 6 पैकी 4 चुडेल काढून मुलीच्या परिवाराकडून काही रक्कमही उकळली आहे.

हेही वाचा - दु:खाचा डोंगर..! अवघ्या 9 दिवसात सख्ख्या तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू

अंनिसने घेतली धाव -

मुलीच्या अंगात राहिलेल्या 2 चुडेल काढण्यासाठी व पैसे घेण्यासाठी मांत्रिक पुन्हा येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रल्हाद बोहाडे व अशोक तायडे यांना मिळाली. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे यांच्या मार्गदर्शनानुसार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी शेंगोळा येथे जावून पीडित कुटुंबाची भेट घेतली. यापुढे मांत्रिकाकडून अघोरी उपचार करून न घेता वैद्यकीय उपचार चालू ठेवण्याचा सल्ला दिला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना देखील हा सल्ला पटल्याने त्यांनी यापुढे अशी चूक करणार नाही, अशी ग्वाही दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून योग्य मार्गदर्शन पीडित परिवाराला मिळाले. त्यामुळे त्यांनी आभार व्यक्त केले.

Last Updated : Jul 20, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.