ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार - खडसे - जयंत पाटील यांचा जळगाव दौरा

राज्याचे राजकारण आता बदलत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ती अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार
महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार
author img

By

Published : Feb 3, 2021, 6:42 PM IST

जळगाव - राज्याचे राजकारण आता बदलत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ती अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच यांना 'पुन्हा येईल, पुन्हा येईल' करतच रहावे लागेल, असा टोलाही यावेळी खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 11 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन करत विरोधकांना चिमटे काढले.

फडणवीस यांना पुन्हा केले लक्ष्य

एकनाथ खडसे यांनी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. खडसे पुढे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात अधिक यशस्वी झाला पाहिजे. आता राज्यातील राजकारण बदलत आहे. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण हे सरकार टिकणार आहे. कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये, म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे विरोधक आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. आपले सरकार पाच वर्ष टिकणार आहे. यांना पुन्हा येईल, पुन्हा येईल करतच रहावे लागेल. यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली हे सर्वांना माहिती असल्याचे म्हणत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला.

टीका टिप्पणी होत राहणार

कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा वाढेल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा. टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जे आमच्यावर टीका करतात ते गावातच असतात. ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही, ते नाथाभाऊचे नाव घेतात. असे सांगत खडसेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार
वर्तमानपत्रात कधी काय येते, याचा मला चांगला अनुभव

वर्तमानपत्रात कधी काही छापून आले तर पॅनिक होऊ नका. वर्तमानपत्रात कधी चांगले तर कधी वाईट येते. वर्तमानपत्रात कधी काय येते, याचा मला गेल्या 40 वर्षांत चांगला अनुभव आहे. आपलं काम सोडू नका, आपल्याला एकजुटीने काम करायचे आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार मनीष जैन, अरुण पाटील यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.