ETV Bharat / state

केवळ आणि केवळ फडणवीसांमुळेच भाजपातून बाहेर पडलो - एकनाथ खडसे

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत. मला देवेंद्र फडणवीस यांनी छळले. माझ्यावर अन्याय केला. अन्यायाबाबत मी पक्षाकडे वेळोवेळी माझी भूमिका मांडली. पण मला न्याय मिळाला नाही. म्हणून मी भाजपाचा त्याग केला, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 22, 2020, 2:30 PM IST

Updated : Oct 22, 2020, 2:37 PM IST

जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजपा सोडल्याचे ते म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात मी 40 वर्षं भाजपाच्या वाढीसाठी खर्ची घातली. पक्षानेही मला खूप काही दिले. परंतु, गेल्या साडेचार वर्षांपासून मला देवेंद्र फडणवीस यांनी छळले. माझ्यावर अन्याय केला. अन्यायाबाबत मी पक्षाकडे वेळोवेळी माझी भूमिका मांडली. पण मला न्याय मिळाला नाही. शेवटी मी समर्थकांशी निर्णय घेऊन भाजपाची साथ सोडली, असे आज एकनाथ खडसे यांनी सांगितले.

माजीमंत्री एकनाथ खडसे

राष्ट्रवादीत पदाची अपेक्षा नाही

मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत जात नाहीये. मला जिल्ह्यासह राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे हे आज हेलिकॉप्टरने मुंबईला जात आहेत.

माझ्यावर खोट्या केसेस

माझ्यावर ज्या खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत, त्यासाठीफडणवीसांनी मदत केली. विनयभंगसारखा खटला माझ्यावर दाखल झाला. आज विनयभंगासारखा खटला माझ्यावर ते दाखल करू शकतात तर, उद्या काहीही अघटित घडू शकते. अशी माझी धारणा झाल्यानेच मी केवळ आणि केवळ फडणवीसांमुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असेही खडसेंनी स्पष्ट केले.

खान्देशातील अनेक नेते माझ्यासोबत

रक्षा खडसे भाजपात राहणार असून, उद्या माझ्यासोबत कन्या ऍड. रोहिणी खडसे तसेच पत्नी जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असेही खडसेंनी सांगितले. माझ्यासोबत खान्देशातील अनेक माजी आमदार देखील सुरुवातीला राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यानंतर समर्थक भाजपा सोडून राष्ट्रवादीत येतील, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Oct 22, 2020, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.