ETV Bharat / state

वेध विधानसभेचे : जळगाव शहर मतदारसंघ; युतीच्या तहात जागा भाजपला की सेनेला...मतदारांमध्ये उत्सुकता - overview Jalgaon City Assembly Constituency

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आमदारकी पाठोपाठ जळगाव महापालिकेवरही आपला झेंडा रोवला. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेला भाजपने दोन्ही ठिकाणी शह दिला. त्यामुळे आता येणारी निवडणूक ही दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढणार असल्याने जळगाव शहर मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार रिंगणात असेल? याचीच मतदारांना उत्सुकता आहे...

आढावा जळगाव शहर मतदारसंघ
author img

By

Published : Aug 31, 2019, 8:26 AM IST

Updated : Aug 31, 2019, 4:49 PM IST

जळगाव - राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी प्रमुख असलेला 'जळगाव शहर मतदारसंघ' यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

वेध विधानसभेचे : जळगाव शहर मतदारसंघ

जळगाव शहर मतदारसंघांचा पूर्वेतिहास..

२०१४ पूर्वी जळगाव शहर मतदारसंघाचे नाव घेतले तर माजी मंत्री सुरेश जैन यांचे नाव डोळ्यासमोर येत होते. कारण या मतदारसंघातून जैन तब्बल नऊ वेळा निवडणूक आले होते. मात्र, २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी दहाव्यांदा आमदारकीचा विक्रम करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरलेले शिवसेनेचे सुरेश जैन यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत युती तुटल्याने भाजप आणि सेना स्वतंत्र लढले होते. सुरेश जैन यांचा अनपेक्षितपणे पराभव करत भाजपने जळगाव शहर मतदारसंघात आपले पाय रोवले होते. त्यानंतर झालेली महापालिका निवडणूक देखील दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिकेतही भाजपने एकहाती सत्ता स्थापन करत जळगाव शहरात आपला बालेकिल्ला भक्कम केला होता.

हेही वाचा... जळगाव महापालिकेच्या महासभेत स्वच्छतेच्या विषयावरून भाजप-सेना आमने सामने

मात्र, यावेळी युतीच्या तहामुळे भाजपला राजकीय आखाड्यात हा बालेकिल्ला आता किल्लेदारासह सेनेला सोडण्याची वेळ येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण युतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा सेनेच्या वाट्याला आहे. युतीधर्म पाळताना शिवसेनेच्या आग्रहामुळे हा मूळ मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागू शकतो आहे. त्यामुळे राजकीय ताकद असूनही भाजपला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागते की काय ? या भीतीमुळे भाजप कार्यकर्ते नाराज होते. परंतु, महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान आमदार सुरेश भोळेंच्या नावे जनादेश मागितला. त्यामुळे ही जागा भाजपच लढवणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत मिळाले असून भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे दुणावला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेमुळे सेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. हक्काच्या जागेवर पाणी कसे सोडायचे? असा प्रश्न सेनेच्या इच्छुकांसह कार्यकर्त्यांना पडला आहे.

हेही वाचा... बहुजन समाजाच्या नेत्यांचा भाजपकडून फक्त वापर; माजी आमदार शिरीष चौधरींचे टीकास्त्र

जळगाव शहर मतदारसंघाची सद्यस्थिती...

विरोधी पक्ष प्रभावहीन

जळगाव शहर मतदारसंघात सद्यस्थितीत भाजप खालोखाल सेनेची ताकद अधिक आहे. विद्यमान आमदार सुरेश भोळे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. या शिवाय महापालिकेत ५७ नगरसेवक देखील भाजपचेच आहेत तर १५ नगरसेवकांसह शिवसेनेचीही ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र, विरोधीपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष प्रभावहीन आहेत. विधानसभा निवडणुकीत समोर कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी याठिकाणी युतीचाच उमेदवार मैदान मारेल, याचीच शक्यता अधिक आहे. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. युतीच्या विरोधात रिंगणात उतरणाऱ्या आघाडीच्या फॉर्म्युल्यात ही जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, विरोधी पक्षांकडे अजूनही सक्षम उमेदवार नाही. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नाव आघाडीकडून इच्छुक असलेल्यांमध्ये अग्रस्थानी आहे. 'जळगाव फर्स्ट'च्या माध्यमातून ते कामाला देखील लागले आहेत.

हेही वाचा... लोकसभेच्या यशामुळे विधानसभेला गाफिल राहू नका; जळगावात भाजप नेत्यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान

या प्रश्नांभोवती फिरते मतदारसंघाचे राजकारण...

जळगाव शहर मतदारसंघाचे राजकारण हे प्रामुख्याने मूलभूत सुविधांच्या अवतीभोवती फिरते, असा आजवरचा अनुभव आहे. शहराचा रखडलेला विकास, अंतर्गत रस्ते, समांतर रस्ते, उड्डाणपूल, महापालिकेवरील कर्ज, गाळेधारकांचा प्रश्न याच मुद्यांभोवती आताची निवडणूक अवलंबून असणार आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांचा विषय हा प्रमुख राजकीय मुद्दा बनवला जाऊ शकतो. ५७ नगरसेवक असलेल्या भाजपकडून गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी आणल्याचा दावा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना, सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना, विविध उड्डाणपूलांची उभारणी अशा कामांना सुरुवात झाली असून वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेवरील हुडको व जिल्हा बँकेचे कर्ज फेडीचा मुद्दाही भाजप प्रचारात आणेल, यात शंका नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून गेल्या ३५ वर्षात शहराची झालेली पिछेहाट, हा मुद्दा शस्त्र म्हणून युतीच्या विरोधात वापरला जाऊ शकतो. पण त्याला कितपत समर्थन मिळेल, हे सांगणे कठीण आहे.

हेही वाचा... जळगाव महापालिका : वर्षपूर्ती होऊनही भाजपला सूर गवसेना; विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेकडून कोंडी सुरूच

हे असू शकतात संभाव्य उमेदवार...

युतीच्या तहात जळगाव शहराची जागा शिवसेनेला सुटल्यास माजी मंत्री सुरेश जैन हे उमेदवार असतील. मात्र, घरकुल घोटाळ्याचा निकाल हा सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्त्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. घरकुल घोटाळ्यात जैन यांना शिक्षा झाली तर त्यांची दुसरी फळी म्हणून शिवसेनेकडून माजी महापौर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन ही नावे चर्चेत आहेत. याठिकाणी विद्यमान आमदार भाजपचा असल्याने भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या संकेतानुसार ही जागा भाजपच लढवू शकतो. तसे झाले तर युतीचे उमेदवार म्हणून भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे हेच पुन्हा एकदा रिंगणात असतील. जळगाव शहराच्या जागेवरून युतीत बेबनाव नको म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या जामनेरऐवजी जळगाव शहरातून लढतील. कारण सुरेश जैन आणि महाजन यांच्यातील ट्युनिंग चांगले आहे, असा मतप्रवाह आहे. परंतु, तसे होण्याची शक्यता फार कमी आहे. भाजपच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे, सुनील वामनराव खडसे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. काँग्रेसकडून महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नावे पुढे येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाजप आणि सेनेत युती फिस्कटली तर मात्र, याठिकाणी प्रमुख लढत ही गेल्या वेळेप्रमाणे भाजप-सेनेतच होईल, हे नक्की. वंचित बहुजन आघाडीचा करिष्मा या मतदारसंघात फारसा चालेल असे नाही. कारण आजच्या घडीला तरी वंचित बहुजन आघाडीकडून कोणीही इच्छुक म्हणून पुढे आलेले नाही.

हेही वाचा... जळगाव महापालिका अखेर कर्जमुक्त, हुडकोच्या कर्जाचे भूत उतरणार

वंचितमुळे वाढेल आघाडीची डोकेदुखी...

मागच्या निवडणूकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना अवघी ४ हजार मते पडली होती. महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी केली होती. तरीही त्यांना पावणेचार लाख मतांपैकी १० हजार मतेही मिळू शकली नव्हती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उन्मेष पाटील यांना जळगाव शहरातून ७७ हजार ३९० मतांचे मताधिक्य मिळाले. तर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना फक्त ५५ हजार मते मिळाली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघात विधानसभेला उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. हा उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला डोकेदुखी ठरू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे होणारे मतांचे विभाजन आघाडीला मारक ठरेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

असा आहे जळगाव शहर मतदारसंघ...

एकूण मतदार : ३ लाख ८६ हजार ७३४
पुरुष मतदार : २ लाख ४ हजार ४५६
महिला मतदार : १ लाख ८२ हजार २४६

२०१४ विधानसभेत कुणाला विजय

सुरेश भोळे (भाजप) ८८ हजार ३६३
सुरेश जैन (शिवसेना) ४६ हजार ०४९ (पराभूत)

२०१९ लोकसभेत कुणाला किती मताधिक्य

भाजप : १ लाख २६ हजार ६३३
राष्ट्रवादी काँग्रेस : ५५ हजार २६५

हेही वाचा... जळगावच्या विद्यापिठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता

Intro:feed send to ftp
(slug : mh_jlg_01_jalgaon_city_review_vis_7205050)

जळगाव
विधानसभा निवडणूक अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी प्रमुख असलेला 'जळगाव शहर मतदारसंघ' हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आमदारकी पाठोपाठ महापालिकेवरही आपला झेंडा रोवला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपने दोन्ही ठिकाणी शह दिला. आता येणारी निवडणूक दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढणार असल्याने या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार रिंगणात असेल? याची मतदारांना उत्सुकता आहे.Body:२०१४ पूर्वी जळगाव शहर मतदारसंघाचे नाव घेतले तर माजीमंत्री सुरेश जैन यांचे नाव डोळ्यासमोर येत होते. कारण या मतदारसंघातून जैन तब्बल नऊ वेळा निवडणूक आले होते. मात्र, २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी दहाव्यांदा अामदारकीचा विक्रम करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरलेले शिवसेनेचे सुरेश जैन यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत युती तुटल्याने भाजप आणि सेना स्वतंत्र लढले होते. सुरेश जैन यांचा अनपेक्षितपणे पराभव करत भाजपने जळगाव शहर मतदारसंघात आपले पाय राेवलेे होते. त्यानंतर झालेली महापालिका निवडणूक देखील दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. विधानसभा निवडणुकीपाठाेपाठ महापालिकेतही भाजपने एकहाती सत्ता स्थापन करीत जळगाव शहरात आपला बालेकिल्ला भक्कम केला होता. मात्र, यावेळी युतीच्या तहामुळे भाजपला राजकीय अाखाड्यात हा बालेकिल्ला आता किल्लेदारासह सेनेला साेडण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण युतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा सेनेच्या वाट्याला आहे. युतीधर्म पाळताना शिवसेनेच्या अाग्रहामुळे हा मूळ मतदारसंघ शिवसेनेला साेडावा लागणार अाहे. त्यामुळे राजकीय ताकद असूनही भाजपला या मतदारसंघावर पाणी साेडावे लागते की काय ? अशा भीतीमुळे भाजप कार्यकर्ते नाराज होते. परंतु, महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान आमदार सुरेश भोळेंच्या नावे जनादेश मागितला. त्यामुळे ही जागा भाजपच लढवणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत मिळाले असून भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेमुळे सेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. हक्काच्या जागेवर पाणी कसे सोडायचे? असा प्रश्न सेनेच्या इच्छुकांसह कार्यकर्त्यांना पडला आहे.

विरोधी पक्ष प्रभावहीन-

सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजप खालोखाल सेनेची ताकद आहे. विद्यमान आमदार सुरेश भोळे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. या शिवाय महापालिकेत ५७ नगरसेवक देखील भाजपचेच आहेत. तर १५ नगरसेवकांसह शिवसेनेचीही ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र, विरोधीपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष प्रभावहीन आहेत. विधानसभा निवडणुकीत समोर कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी याठिकाणी युतीचाच उमेदवार मैदान मारेल, यात शंका नाही. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. युतीच्या विरोधात रिंगणात उतरणाऱ्या आघाडीच्या फॉर्म्युल्यात ही जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, विराेधी पक्षांकडे अजूनही सक्षम उमेदवार नाही. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नाव आघाडीकडून इच्छुक असलेल्यांमध्ये अग्रस्थानी आहे. 'जळगाव फर्स्ट'च्या माध्यमातून ते कामाला देखील लागले आहेत.

या प्रश्नांभोवती फिरते मतदारसंघाचे राजकारण-

जळगाव शहर मतदारसंघाचे राजकारण हे मूलभूत सुविधांच्या अवतीभोवती फिरते, असा आजवरचा अनुभव आहे. शहराचा रखडलेला विकास, अंतर्गत रस्ते, समांतर रस्ते, उड्डाणपूल, महापालिकेवरील कर्ज, गाळेधारकांचा प्रश्न या मुद्यांभाेवती आताची निवडणूक फिरणार आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांचा विषय हा प्रमुख राजकीय मुद्दा बनवला जाऊ शकतो. ५७ नगरसेवक असलेल्या भाजपकडून गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी आणल्याचा दावा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना, सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना, विविध उड्डाणपूलांची उभारणी अशा कामांना सुरुवात झाली असून वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेवरील हुडको व जिल्हा बँकेचे कर्ज फेडीचा मुद्दाही भाजप प्रचारात आणेल, यात शंका नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून गेल्या ३५ वर्षात शहराची झालेली पिछेहाट, हा मुद्दा शस्त्र म्हणून युती विरोधात वापरला जाऊ शकतो. पण त्याला कितपत समर्थन मिळते, हे सांगणे कठीण आहे.

हे असू शकतात संभाव्य उमेदवार-

युतीच्या तहात जळगाव शहराची जागा शिवसेनेला सुटल्यास माजीमंत्री सुरेश जैन हे उमेदवार असतील. मात्र, घरकुल घाेटाळ्याचा निकाल हा सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्त्वासाठी महत्त्वाचा ठरणार अाहे. घरकुल घाेटाळ्यात जैन यांना शिक्षा झाली तर त्यांची दुसरी फळी म्हणून शिवसेनेकडून माजी महापाैर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन ही नावे चर्चेत अाहेत. याठिकाणी विद्यमान आमदार भाजपचा असल्याने भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या संकेतानुसार ही जागा भाजपच लढवू शकतो. तसे झाले तर युतीचे उमेदवार म्हणून भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे हेच पुन्हा एकदा रिंगणात असतील. जळगाव शहराच्या जागेवरून युतीत बेबनाव नको म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या जामनेरऐवजी जळगाव शहरातून लढतील. कारण सुरेश जैन आणि महाजन यांच्यात ट्युनिंग चांगले आहे, असाही मतप्रवाह आहे. परंतु, तसे होण्याची शक्यता फार कमी आहे. भाजपच्या गाेटातून स्वीकृत नगरसेवक कैलास साेनवणे, सुनील वामनराव खडसे यांच्यासह अनेक जण इच्छुक अाहेत. काँग्रेसकडून महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी यांचे नावे पुढे येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाजप आणि सेनेत युती फिस्कटली तर मात्र, याठिकाणी प्रमुख लढत ही गेल्या वेळेप्रमाणे भाजप-सेनेतच होईल, हे नक्की. वंचित बहुजन आघाडीचा करिष्मा या मतदारसंघात फारसा चालणार नाही. आजच्या घडीला तरी वंचित बहुजन आघाडीकडून कोणीही इच्छुक म्हणून पुढे आलेले नाही.

वंचितमुळे वाढेल अाघाडीची डाेकेदुखी-

गेल्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना अवघी ४ हजार मते पडली हाेती. महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने अाघाडी केली होती. तरीही त्यांना पावणेचार लाख मतांपैकी १० हजार मतेही मिळू शकली नव्हती. यंदाच्या लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या उन्मेष पाटील यांना जळगाव शहरातून ७७ हजार ३९० मतांचे मताधिक्य मिळाले. तर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना फक्त ५५ हजार मते मिळाली होती. दरम्यान, वंचित बहुजन अाघाडीकडून विधानसभेला उमेदवार दिला जाण्याची शक्यता अाहे. हा उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला डोकेदुखी ठरू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे होणारे मतांचे विभाजन आघाडीला मारक ठरेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.Conclusion:असा अाहे जळगाव शहर मतदारसंघ-

एकूण मतदार : ३ लाख ८६ हजार ७३४
पुरुष मतदार : २ लाख ४ हजार ४५६
महिला मतदार : १ लाख ८२ हजार २४६

२०१४ विधानसभेत कुणाला विजय-

सुरेश भाेळे (भाजप) ८८ हजार ३६३
सुरेश जैन (शिवसेना) ४६ हजार ०४९

२०१९ लोकसभेत कुणाला किती मताधिक्य-

भाजप : १ लाख २६ हजार ६३३
राष्ट्रवादी काँग्रेस : ५५ हजार २६५

बाईट :
1) सुरेश भोळे, विद्यमान भाजप आमदार (पांढरा शर्ट)
2) डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष (निळा चौकटीचा शर्ट, चष्मा लावलेले)
3) डॉ. गोपी सोरडे (चौकटीचा शर्ट)
Last Updated : Aug 31, 2019, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.