ETV Bharat / state

Maha Vikas aghadi : आगामी सर्व निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रच लढवणार - गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीने (Maha Vikas aghadi) एकत्रित लढवित विजय मिळवला. त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीत्यांसह इतर निवडणूका राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे महाआघाडीतील घटक पक्ष एकत्र लढवणार असल्याची माहिती पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी दिली. हा एक प्रकारे भाजपला इशाराच असल्याचे समजले जात आहे.

Gulabrao Patil
Gulabrao Patil
author img

By

Published : Dec 5, 2021, 4:42 PM IST

Updated : Dec 5, 2021, 4:54 PM IST

जळगाव - महाविकास आघाडीने (Maha Vikas aghadi) एकत्र निवडणूक लढवित जिल्हा बँक ताब्यात घेतली. आगामी काळातही अशाप्रकारे महाविकास आघाडी (Maha Vikas aghadi) जिल्हा परिषद, पंचायत समितीत्यांसह इतर निवडणूका एकत्र लढवणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी रविवारी पत्रकारांनी बोलताना दिला. दरम्यान एकप्रकारे हा महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्र्यांनी भाजपला इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे.

पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil ) हे जळगावातील लेवा भवनात आयोजित वधु-वर परिचय मेळाव्यासाठी हजर होते. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी जिल्हा बँकेवर महाविकास विकास आघाडीचा झेंडा फडकाविला आहे. या निवडणुकीत विजयानंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मनोबल वाढले आहे. राज्यात महाविकास विकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळेच सहा महिन्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समितींच्या निवडणुका आहेत. या निवडणुका सुध्दा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न राहणार असून सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान आगामी काळात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवितात का, हा प्रश्‍न सध्यस्थितीत जरी अनुत्तरीत असला तरी, मात्र महाविकास आघाडी सर्वच ठिकाणी झेंडा फडकविणार हे पालकमंत्र्यांचे वक्तव्य भाजप पक्षासाठी एकप्रकारे इशारा मानला जात आहे.

हे ही वाचा - ममता बॅनर्जी फॅसिस्ट नाहीत, त्यांच्यावरील टीका अयोग्य;मलिकांची प्रतिक्रिया

Last Updated : Dec 5, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.