ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे ४ एकरावरील शिमला मिरची उपटून फेकली;  २५ ते ३० लाखांचे नुकसान - जळगाव कोरोना न्यूज

आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतीच्या मशागतीसाठी पैसे कोठून आणायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने काही तरी मदत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे ४ एकरावरील शिमला मिरची उपटून फेकली; जळगावातील पाटील बंधूंचे २५ ते ३० लाखांचे नुकसान

author img

By

Published : May 4, 2020, 9:41 PM IST

जळगाव - लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री आणि पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लगत आहे. अशाचप्रकारे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मंगरूळ येथील पंकज आणि प्रवीण राजीव पाटील या बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी मोठ्या श्रमाने पिकवलेल्या शिमला मिरचीला लॉकडाऊनमुळे वेळेवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे ४ एकरावरील शिमला मिरची त्यांनी उपटून फेकली आहे. अशा परिस्थितीत डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत ते सापडले आहेत.

लॉकडाऊनमुळे ४ एकरावरील शिमला मिरची उपटून फेकली; जळगावातील पाटील बंधूंचे २५ ते ३० लाखांचे नुकसान

रावेर तालुका हा जळगाव जिल्ह्यातील केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडे निसर्गाचा लहरीपणा, पूरक शासकीय धोरणांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. म्हणून केळी उत्पादक असलेल्या पाटील बंधूंनी केळीला पर्याय म्हणून आपल्या शेतात ४ एकरावर हरितगृह उभारून शिमला मिरची लागवड केली होती. हरितगृह उभारणीसाठी त्यांना तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च आला होता. हा पैसा त्यांनी बँक तसेच खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन उभा केला होता. हरितगृह उभारल्यानंतर त्यांना शिमला मिरचीची रोपे, रासायनिक व मिश्र खते, कीटकनाशके, मशागत तसेच मजुरी मिळून सुमारे १३ ते १५ लाख रुपये खर्च आला होता. शिमला मिरचीची जानेवारीत लागवड केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले. ते जून ते जुलैच्या सुरुवातीपर्यंत कायम राहिले असते. मात्र, कोरोना आला आणि त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. हरितगृहातील मिरची चांगली बहरली होती. परंतु, मार्चमध्येच कोरोना आल्याने मिरची बाजारपेठेत विक्रीसाठी नेता आली नाही. लॉकडाऊनमुळे मिरचीला बाजारपेठ मिळाली नाही. अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क केला पण पदरी निराशाच आली. शेतातील मिरचीची वेळेत तोडणी झाली नाही म्हणून हिरवी मिरची झाडावरच पिकून जमिनीवर गळू लागली. शेवटी त्यांनी संपूर्ण मिरची उपटून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला.

२५ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न होते अपेक्षित - पाटील बंधूंनी आपल्या शेतातील ४ एकरावर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या एका योजनेतून हरितगृह उभारून त्यात शिमला मिरचीची लागवड केली होती. या प्रकल्पासाठी त्यांनी त्यांच्या आई लीलाबाई यांच्या नावाने प्रस्ताव नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाला सादर केला होता. हा प्रस्ताव ज्या मध्यस्थाकडून त्यांनी तयार केला होता, त्यानेही त्यांची फसवणूक केली. बँकेनेही या संदर्भात लक्ष न दिल्याने प्रकल्पासाठीचे अनुदान मिळाले नाही. त्यानंतर लॉकडाऊनमुळे उत्पादित मिरची विकता आली नाही. त्यांना २५ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, एका रुपयाचेही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे.

कर्ज कसे फेडायचे?

शिमला मिरचीतून एक रुपयाचेदेखील उत्पन्न मिळू शकले नाही. अशा परिस्थितीत बँक तसेच खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे? अशी चिंता पाटील बंधूंना सतावत आहे. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतीच्या मशागतीसाठी पैसे कोठून आणायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने काही तरी मदत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.