ETV Bharat / state

खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेने राष्ट्रवादीची स्थानिक नेतेमंडळी अस्वस्थ - खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी खडसेंना आश्रय देऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, आजवर ज्या खडसेंशी सामना केला, त्यांना पक्षात घेतले तर कसे 'अॅडजस्ट' करायचे? एवढे दिवस पक्षाशी प्रामाणिक राहून आता खडसेंच्या रुपाने बाहेरून आलेले नेतृत्त्व कसे स्वीकारायचे? अशा विचारात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पडले आहेत.

Eknath Khadse joining NCP
एकनाथ खडसे
author img

By

Published : Sep 28, 2020, 11:26 AM IST

Updated : Sep 28, 2020, 12:41 PM IST

जळगाव - भाजपातील पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाकडून न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून खडसेंनी यापूर्वी अनेकदा पक्षांतराचे संकेत उघडपणे दिले. परंतु, अद्यापही ते भाजपातच आहेत. त्यामुळे खडसे खरोखर राष्ट्रवादीत जातील का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात आहे. ते खरंच राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील का? हे निश्चित नसले तरी केवळ त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपा वाढत असताना आपले अस्तित्त्व राखण्यासाठी ज्या खडसेंशी सामना केला, आज त्याच खडसेंना नेता म्हणून कसे स्वीकारायचे? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेने राष्ट्रवादीची स्थानिक नेतेमंडळी अस्वस्थ

आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्त्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून एकनाथ खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपात सतत डावलले जात आहे. २०१४ मध्ये राज्याच्या सत्तेत आल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाची मनिषा होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. महसूलसह १२ खात्यांचे ते मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या साऱ्या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याची आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून ते पक्षावर प्रचंड नाराज आहेत.

मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर ते स्वतःला तिकीट मिळवू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्येला तिकीट दिले. दुर्दैवाने त्यांच्या कन्येचा पराभव झाला. त्यामुळे खडसेंच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला. कन्येच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजपा विरोधात मोट बांधली होती. आता तर त्यांच्या बंडाची धग तीव्र झाली आहे. आपल्याला त्रास देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख हात असल्याचा आरोप खडसेंनी त्यांचे नाव घेत उघडपणे केला आहे. पक्षाकडून सतत अपमानित केले जात असल्याने आता ते वेगळा विचार करण्याच्या मनःस्थितीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीनंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे खडसे पक्षांतर करतीलच, या शंकेला बळ मिळाले आहे. मध्यंतरी गोपीनाथ गडावर भाषण करताना खडसेंनी आपल्या पक्षाच्या राज्य नेतृत्त्वाला लक्ष्य केले होते. 'आता आपलं काही सांगता येणार नाही', अशा शब्दांत त्यांनी तेव्हाही पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यावेळी ते शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. पण खडसेंनी तेव्हाही भाजपातच राहणे पसंत केले. आता पुन्हा खडसेंच्या पक्षांतराची चर्चा रगंली आहे.

पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादीची खेळी-

खडसेंना राष्ट्रवादीचा पर्याय अधिक सोयीचा असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. राष्ट्रवादी म्हणजे मराठा समाजाचे प्राबल्य असलेला पक्ष आहे. राष्ट्रवादीत असलेली जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य नेतेमंडळी ही मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करते. एकनाथ खडसे हे बहुजन समाजातील नेते आहेत. अल्पसंख्याक समाज देखील मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी खडसेंना आश्रय देऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, ही बाब राष्ट्रवादी जाणून आहे. जळगाव जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. याठिकाणी 5 ते 6 आमदार निवडून येत होते. अशा परिस्थितीत शरद पवारांनी जिल्ह्यातील गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे या नेत्यांना मंत्रीपदाची संधीही दिली. पण जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन वाढले नाही. आता तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था खूप वाईट आहे. केवळ एकच आमदार प्रतिनिधित्व करत आहे.

शरद पवारांना कदाचित एका दगडात दोन पक्षी मारायचे असतील. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा घडवून आपल्या पक्षातील नेत्यांचे कान टोचायचे असतील; किंवा विधानसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनी आपल्याला राष्ट्रवादीची ऑफर असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती, त्याच खडसेंची आता भाजपातील होणारी कोंडी पाहून विधानसभा निवडणुकीच्या काळातील बदला पवारांना घ्यायचा असेल, असेही राजकीय म्हणत आहेत. दुसरीकडे एक मतप्रवाह असाही आहे की, शरद पवारांना पक्षाचे जिल्ह्यातील संघटन मजबूत करायचे असेल म्हणून खडसेंच्या आयातीची कल्पना त्यांनी आणली असावी. कारण सध्या राज्याच्या सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्यामुळे भाजपा हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपाला शह देण्यासाठी खडसेंसारखा दुसरा पर्याय नाही. भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन खडसेंना 'फायर ब्रँड' नेता म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते, असा शरद पवारांचा विचार असू शकतो. जर खडसेंना खरंच पक्षांतर करायचे असेल तर त्यांना आता राष्ट्रवादीने उपलब्ध करून दिलेली आयती संधी आहे. त्यामुळेच तर खडसे राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील, ही शक्यता अधिक आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगलेली असल्याने राष्ट्रवादीच्या एका गटात मात्र अस्वस्थता आहे. खडसे प्रतिनिधित्व करत असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील तसेच विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे खडसेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. अॅड. रवींद्र पाटील खडसेंविरोधात अनेक निवडणुका देखील लढले आहेत. त्याचप्रमाणे आता आमदार म्हणून निवडून आलेले चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे असले तरी ते राष्ट्रवादीचे पुरस्कृत म्हणून निवडून आले आहेत. ते पण एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंचा पराभव करून. अशा परिस्थितीत खडसेंना जर राष्ट्रवादीत घेतले तर अॅड. पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशी शंका उपस्थित करून त्यांच्या समर्थकांनी खडसेंना विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेमंडळी देखील अस्वस्थ आहेत. आजवर ज्या खडसेंशी सामना केला, त्यांना पक्षात घेतले तर कसे 'अॅडजस्ट' करायचे? एवढे दिवस पक्षाशी प्रामाणिक राहून आता खडसेंच्या रुपाने बाहेरून आलेले नेतृत्त्व कसे स्वीकारायचे? अशा विचारात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पडले आहेत. त्यामुळेच ही नेतेमंडळी खडसेंच्या प्रवेशाला अडसर आणत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी घालू शकते अटी व शर्ती-

एकनाथ खडसे यांना पक्षात घ्यायचेच असेल तर राष्ट्रवादीकडून निश्चितच काही अटी व शर्ती खडसेंना घालण्यात येतील. खडसेंच्या सून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या खासदार आहेत. कदाचित त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीकडून होऊ शकते. रक्षा खडसे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत खासदारकीवर पाणी कसे सोडायचे? हा मोठा प्रश्न खडसेंसमोर असावा, म्हणूनच ते पक्षांतराच्या बाबतीत थेट निर्णय घेऊ शकत नसतील, असेही बोलले जात आहे. दुसरीकडे खडसेंनी भाजपासाठी ४० वर्षे खर्ची घातली आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या पक्षाचा पर्याय कसा निवडायचा? जर पक्षाने पुनवर्सन केले तर इकडे निश्चितच मोठ्या पदावर संधी मिळेल, आणि दुसऱ्या पक्षात गेले तर पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल. हा विचार खडसे करत असतील. भाजपात आजही खडसे थेट मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे खडसे पक्षाकडून न्याय मिळण्याच्या अपेक्षेत असावेत, म्हणूनच ते आपला निर्णय जाहीर करत नसावेत, असेही सांगितले जात आहे.

खडसेंना भाजपाची दारे बंद?

गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसे न्यायासाठी पक्षाशी भांडत आहेत. पण त्यांच्या बाबतीत भाजपा निर्णय देत नाहीये. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसेंना पद्धतशीरपणे बाजूला सारले गेले. विधानसभेत तिकीट नाकारले, त्यानंतर कोअर कमिटीतून बाजूला करत निर्णय प्रक्रियेतूनही काढले. नंतर विधानपरिषद, राज्यसभेची संधी नाकारली. आता तर अलीकडेच राज्य कार्यकारिणीतून बाद केले. त्यामुळे खडसेंना केंद्रीय कार्यकारिणीवर येण्याची आशा होती. पण दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीतही खडसेंना स्थान मिळाले नाही. त्यामुळे खडसेंना भाजपाची दारे बंद झाल्याचे दिसून येत आहे. खडसेंपेक्षा खालच्या फळीतील नेते असलेले विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचे पुनवर्सन झाले आहे. पण खडसेंना मात्र, भाजपाने सापत्न वागणूक दिली आहे. या साऱ्या घडामोडींमुळे खडसे आता नक्की पक्षांतर करतील, असेही राजकीय जाणकार सांगत आहेत.

Last Updated : Sep 28, 2020, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.