ETV Bharat / state

जळगावात आजपासून दारू विक्रिला परवानगी; तळीरामांची दुकांनांसमोर लांब रांग

जिल्हाधिकाऱ्यांनी दारू विक्रीला सशर्त परवानगी देत असल्याचे जाहीर केल्यानंतर सोमवारी सायंकाळीपासूनच दारू विक्रेत्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. दुकानांसमोर तळीरामांची गर्दी टाळण्यासाठी बांबूची रेलिंग करणे, तळीरामांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारणे, अशी खास व्यवस्था करण्यात आली होती.

liquor sale jalgaon
जळगाव दारूची दुकाने
author img

By

Published : May 5, 2020, 12:12 PM IST

जळगाव- जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासूनच तळीरामांची दारूच्या दुकानांसमोर लांब रांगा लागल्याचे चित्र होते. दुकाने उघडण्यापूर्वीच अनेक जण दारू घेण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. तब्बल दीड महिन्यांनी दारू मिळणार असल्याने तळीराम खुश आहेत.

दारूच्या दुकानासमोर तळीरामांची रांग

जिल्हाधिकाऱ्यांनी दारू विक्रीला सशर्त परवानगी देत असल्याचे जाहीर केल्यानंतर सोमवारी सायंकाळी दारू विक्रेत्यांनी योग्य त्या उपाय योजना करण्यास केल्या. दुकानांसमोर तळीरामांची गर्दी टाळण्यासाठी बांबूची रेलिंग करणे, तळीरामांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारणे, अशी खास व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानांसमोर पांढऱ्या रंगाने वर्तुळ आणि चौकोन देखील आखण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजेपासून दुकाने उघडणार होती. परंतु, तळीरामांनी सकाळी ९ वाजेपासूनच दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या.

दुकान चालकांकडून खबरदारी

कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, यासाठी प्रशासनाने दारू दुकान चालकांना खबरदारीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, दुकान चालकांकडून रांगेतील ग्राहकांच्या हाताला सॅनिटायझर लावणे, प्रत्येकाला मास्क बांधायला लावणे, अशी कार्यवाही केली जात आहे. दरम्यान, काल राज्यभरात ठिकठिकाणी दारूच्या दुकानांसमोर तळीरामांनी गर्दी केली होती, त्यामुळे गोंधळ उडाला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन जळगावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा- जळगावात लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता; दारुसह सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.