ETV Bharat / state

'तुला मुलीच होतात' म्हणत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा, जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल - जळगाव गुन्हे बातमी

'तुला मुलीच होतात', असे म्हणत पत्नीशी वाद घालून तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा सुनावली आहे. यावेळी आरोपीच्या सात वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

जिल्हा न्यायालय
जिल्हा न्यायालय
author img

By

Published : May 19, 2021, 7:58 PM IST

जळगाव - 'तुला मुलीच होतात', असे म्हणत पत्नीशी वाद घालून तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा सुनावली आहे. पप्पू रतन पवार (वय 31 वर्षे, रा. विवेकानंद नगर तांडा, पाचोरा), असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी बुधवारी (दि. 19 मे) दुपारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. दरम्यान, या खटल्यात आरोपीच्या सात वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

खटल्याची थोडक्यात हकीकत अशी

पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे पप्पू पवार हा त्याची मृत पत्नी कस्तुराबाई (वय 30 वर्षे), मुलगी गौरी (वय 7 वर्ष), भाग्यश्री (वय साडेतीन वर्ष) व खुशी (वय दीड वर्ष) यांच्यासह राहत होता. तो पाचोरा येथे एका हॉटेलवर कामाला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. 9 जून, 2019 रोजी रात्री पप्पू याने 'तुला मुलीच होतात', असे म्हणत दारुच्या नशेत पत्नीशी भांडण केले. या भांडणात त्याने लाकडी दांडका पत्नीच्या डोक्‍यात टाकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या कस्तुराबाईला शेजारी राहणाऱ्या भाऊ व वहिनीने पाचोरा येथे रुग्णालयात नेले होते. त्या ठिकाणी तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते.

पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा

या घटनेनंतर कस्तुराबाई हिची आई पद्माबाई सखाराम राठोड (वय 60 वर्षे, रा. आनंद नगर तांडा, ता. एरंडोल) यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन पप्पू पवार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 10 जून, 2019 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी करून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‌ॅड. केतन डाके यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले. त्यात आरोपीची मोठी मुलगी गौरी हिची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. ही सर्व घटना गौरीच्या डोळ्यासमोर घडलेली होती. तिने न्यायालयात घटनाक्रम जसाच्या तसा सांगितला. याशिवाय न्यायालयाने या प्रकरणातील तक्रारदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपास अधिकाऱ्याची साक्ष ग्राह्य धरत आरोपीला शिक्षा सुनावली.

असे आहे शिक्षेचे स्वरूप

पत्नीचा खून केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी पप्पू पवार याला दोषी ठरवून जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, आरोपी पप्पू हा खटल्याचे कामकाज सुरू झाल्यापासून कारागृहात होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याची सुनावणी झाली.

हेही वाचा - जळगाव : कोरोनाचे नियम मोडणे काँग्रेस नेत्यांना भोवले, अजिंठा विश्रामगृहातील बैठक प्रकरणी गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.