ETV Bharat / state

जामनेरात निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला; पिस्तुल रोखून धमकावले

author img

By

Published : Jan 15, 2021, 10:29 AM IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी मध्यरात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी मध्यरात्री वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले.

जामनेरात वादातून चाकू हल्ला
जामनेरात वादातून चाकू हल्ला

जळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जामनेर तालुक्यात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. देवपिंप्री येथे चाकू हल्ला करुन पिस्तुल रोखून धमकावण्यात आले होते. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

निवडणुकीला गालबोट

शुक्रवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी मध्यरात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी मध्यरात्री वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विरूध्द तक्रार
एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकार्‍यांविरूध्द जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात म्हटले आहे की, यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांच्यासह काही समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दीक वाद घातला तेव्हा समर्थकांनी चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला. यात नितीन प्रकाश सोनवणे हा जखमी झाला आहे. त्याने याबाबत पोलीसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा - देशाची पहिली स्वदेशी 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.