ETV Bharat / state

Citizens Beaten Journalist : महिला पोलीस कर्मचाऱ्याची छेड; कथित पत्रकाराला नागरिकांनी दिला चोप

महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करुन विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांना चोप दिला ( Citizens Beaten Journalist In Jalgaon ) आहे. जळगाव शहरातील नेरी नाका येथे ही घटना घडली.

Citizens Beaten Journalist
Citizens Beaten Journalist
author img

By

Published : Mar 18, 2022, 8:51 PM IST

जळगाव - महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करुन विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांना चोप दिला ( Citizens Beaten Journalist In Jalgaon ) आहे. जळगाव शहरातील नेरी नाका येथे ही घटना घडली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीमखान आरमान खान पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी नेरी नाका येथे कर्तव्यावर होत्या. तेव्हा सलीम खान महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे आला आणि एका अधिकाऱ्याच्या मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तेव्हा आपल्याकाडे त्यांचा नंबर नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. तोच राग मनात धरत सलीम महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून आला. 'तेव्हा मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करीन,' अशी धमकी दिली.

कथित पत्रकाराला नागरिकांनी दिला चोप

तसेच, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात पकडून तिचा मोबाईलमध्ये फोटो काढला. याबाबत महिला कर्मचाऱ्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तेव्हा त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, ताब्यात घेण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सलीमला चोप दिला. त्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात सलीमखान आरमान खान पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात - रावसाहेब दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.