ETV Bharat / state

धक्कादायक..! जळगावचा कोरोनाचा मृत्यूदर देशाच्या तुलनेत चौपट - corona mortality rate

जिल्ह्यात कोरोना पाय पसरत असताना गेल्या २ महिन्यातच ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बळींचा देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के असून जळगावचा मात्र ११.४९ टक्के आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर चौपट आहे. जळगावातील मृत्यूदर कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 जळगावचा कोरोना मृत्यूदर
जळगावचा कोरोना मृत्यूदर
author img

By

Published : May 30, 2020, 5:31 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६३५ इतकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात कोरोना पाय पसरत असताना गेल्या २ महिन्यातच ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बळींचा देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के असून, जळगावचा मात्र ११.४९ टक्के आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर चौपट आहे. जळगावातील मृत्यूदर कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात २८ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते मेअखेरपर्यंत म्हणजेच दोनच महिन्याच्या काळात जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच गेली. या काळात तब्बल ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. भुसावळात सर्वाधिक १८ त्या खालोखाल अमळनेर १३ व जळगाव येथील ११ जणांचे मृत्यू झालेले आहेत. रावेरमध्येही ११ बाधितांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर ११.४९ टक्के असला तरी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल आणि मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील तपासणीचा आकडा कमी आहे, अशी माहिती या विषयाबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

मृत्यूदर कमी होईना -

जळगावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मृत्यूदर जास्त आहे. याची गंभीर दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाकडून तसा अहवालही मागवला होता. जिल्ह्यातील मृत्यूदराची कारणे शोधण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक विशेष समितीदेखील नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून राज्य सरकार आणि आरोग्य मंत्रालयाला अहवाल सादर केला होता. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वयोवृद्ध तसेच कर्करोग, हृदयरोग, उच्च रक्तदाब मधुमेह अशा आजारांनी आधीच ग्रस्त असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला होता. परंतु, मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यानंतरही उपाययोजना न झाल्यानेच कोरोनाचे बळी थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी दुपारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ७३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात ९ रुग्णांचा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर २७ रुग्णांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाला. नंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

टेस्ट वाढल्यानंतर मृत्यूदर आटोक्यात येण्याची अपेक्षा-

जळगाव जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मात्र, तुलनेने चाचण्या कमी होत आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर मृत्यूदर आटोक्यात येण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी कोरोना चाचणीची स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. परंतु, या प्रयोगशाळेत दिवसाला फक्त दीडशे चाचण्या होतात. अशा परिस्थितीत रुग्ण व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे. राज्य सरकारने आता मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेतून कोरोना चाचणी करण्यास प्रशासनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच मृत्यूदर आटोक्यात येईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

उपाययोजना वाढवण्यावर भर-

कोरोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना वाढवण्यावर प्रशासन भर देत आहे. जिल्हा रुग्णालयात आधी १० अतिदक्षता बेड्स होते, त्यात पुन्हा २० बेड्स वाढवण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनासाठी अधिग्रहीत केलेल्या एका खासगी रुग्णालयात १० अतिदक्षता बेड्स उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महापालिका तसेच सर्वच नगरपालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये नागरिकांचे स्क्रिनिंग केले जात आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांना तत्काळ क्वारंटाईन केले जात आहे. कोरोनासाठी जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेत उपाययोजना करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.