ETV Bharat / state

आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंघोळीसाठी तलावावर गेलेला जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील एक १८ वर्षीय तरुण काल (शनिवार ता. २३ मे) पाण्यात बुडाला होता. या तरुणाचा मृतदेह आज (रविवार) सकाळी मिळून आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

author img

By

Published : May 24, 2020, 6:15 PM IST

jalgaon youth went to swim on lake died due to drowning
आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव - आंघोळीसाठी तलावावर गेलेला जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील एक १८ वर्षीय तरुण काल (शनिवार ता. २३ मे) पाण्यात बुडाला होता. या तरुणाचा मृतदेह आज (रविवार) सकाळी मिळून आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन साहेबराव राठोड (वय १८, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील काही तरुण गावाशेजारी असलेल्या तलावात आंघोळीसाठी जात होते. चेतन राठोड, नवल राठोड व सागर राठोड असे तिघेजण तलावात शनिवारी आंघोळीसाठी गेले होते. चेतन याला पोहता येत नसल्याने तो खोल खड्ड्यात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघे जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुसऱ्‍या काठावर मासेमारी करीत असलेले हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र, तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही.

चेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी, वावडदा गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेऊन तलावात शोधकार्य राबविले. मात्र, चेतनचा मृतदेह मिळाला नव्हता. रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा. तळवण तांडा, ता. भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळून आला.

चेतन याच्या पश्चात वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई व लहान भाऊ नितीन, बहिण चैताली असा परिवार आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - भुसावळातील 31 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण; जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 382

हेही वाचा - सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीस गिरीश महाजन यांची हरकत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.