ETV Bharat / state

Gulabrao Patil : 40 आमदारानंतर 12 खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार- गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) साहेबांच्या गटात 40 आमदार सध्या आहेत, तर शिवसेनेचे 12 खासदार आमच्या गटात सामील होत असल्याचा गौप्यस्फोट माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Former Water Supply Minister Gulabrao Patil ) यांनी जळगावामध्ये केला आहे.

Gulabrao Patil
गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
author img

By

Published : Jul 6, 2022, 9:31 AM IST

जळगाव - एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) साहेबांच्या गटात 40 आमदार सध्या आहेत, तर शिवसेनेचे 12 खासदार आमच्या गटात सामील होत असल्याचा गौप्यस्फोट माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Former Water Supply Minister Gulabrao Patil ) यांनी जळगावामध्ये केला आहे. शिवसेना पक्ष हा आता आमचाच असून, 4 खासदारांना मी स्वतः भेटलोय. 22 माजी आमदार ही आमच्या गटात सामील होणार असून शिवसेना ( Shiv Sena ) पक्ष पुन्हा नव्या ताकदीने उभा करण्यासाठी आम्ही सर्व बाहेर निघालोय असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.

पक्ष बळ घटत चालल्याने आम्ही सर्वांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून शिवसेनेतून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे गट पुढील काळात शिवसेना म्हणून काम करणार आहे. आम्ही कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. आम्ही आमच्या मंत्रिपदे सोडून शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी बाहेर निघालो, तर ठाकरे कुटुंबीयांवर कोणीही टीका करणार नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. काही लोकांनी उद्धव साहेबांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच हे दिवस आले आहेत. काही लोकांची ऐकून उद्धव साहेबांनी आम्हाला सोडलं आम्ही उद्धव साहेबांना नाही. अशा विविध मुद्द्यांवर माझी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना गौप्यस्फोट केले आहे.

गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीवर बंडखोर आमदारांचे आरोप, तरीही भेट - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे २१ जून रोजी काही निवडक आमदारांसोबत सुरतला गेले होते. त्यानंतर गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात परतले. एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. या संपूर्ण सत्ता नाट्यपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून सातत्याने राष्ट्रवादीवर आरोप केले होते. शिवसेनेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून धोका असल्याचे बंडखोर आमदारांकडून आरोप सत्र सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना फटकारले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शरद पवार यांची भेट नेमकी कशासाठी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट - एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचे सांगितले होते. शरद पवारांपासून त्यांनी याची सुरुवात केली आहे. शिंदे आणि पवार यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही अनौपचारिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - CM Shinde meet Sharad Pawar : आघाडीला सुरुंग लावणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.