ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात भाजपचेच पारडे जड; आघाडी समोर अस्तित्वाचे आव्हान

आम्ही जळगावच्या सर्व ११ जागांसाठी तयार आहे. वरिष्ठांचे आदेश येताच त्यानुसार पुढील दिशा ठरवू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीसाठी जागा अद्याप ठरल्या नाहीत, ज्यावेळी कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ हे ठरल्यास ते नक्कीच जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Sep 14, 2019, 9:38 PM IST

जळगाव - भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. ३ मतदारसंघात शिवसेनेचे तसेच उरलेल्या २ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर एका मतदारसंघात अपक्ष आमदार आहे. भाजप-सेनेची युती तुटली तर भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते. लोकसभेतील युती कायम राहिली तरीही भाजपचेच पारडे सेनेच्या तुलनेत जड राहणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजपचेच पारडे जड

केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार बळकट करण्यासाठी खान्देशातील जळगाव जिल्ह्याने भरभरून राजकीय बळ दिले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारखे वजनदार नेतेमंडळी आहेत. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल, अशीच सध्या चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या २००९ च्या फॉर्म्युल्यानुसार ११ पैकी ६ मतदारसंघ भाजपकडे तर ५ मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेच्या जळगाव शहर मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यामुळे जागा वाटप करताना भाजप विद्यमान आमदारांचा मतदारसंघ सेनेला सोडणार नाही, सध्या तरी हे चित्र स्पष्ट आहे.

हेही वाचा - महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक; जळगावात सरकारचे घातले श्राद्ध

जळगाव शहर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर चोपडा, जळगाव ग्रामीण व पाचोरा-भडगाव या ३ मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ते निवडणुकीच्या मैदानातून सध्या बाद झाले आहेत. यामुळे तिथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा मार्ग तूर्तास मोकळा दिसतो आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप देखील या मतदारसंघात आपली ताकद लावून गुलाबराव पाटलांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेल्या पारोळा मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर आहे. तर अमळनेर मतदारसंघात मुख्यमंत्री त्याचप्रमाणे गिरीश महाजन सांगतील तो उमेदवार ठरणार असल्याने याही मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा - गिरीश महाजनांचे जेवढं वय, तेवढा शरद पवारांचा राजकारणात अनुभव - रवींद्र पाटील

या निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे तिकीट वाटप करताना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगतील तेच उमेदवार राहतील, अशी शक्यता आहे. इकडे आघाडीच्या तंबूत मात्र, वेगळी परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये इच्छुक कमी आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते यावेळी निवडणूक लढवायची की पाच वर्षे थांबायचे या विचारात आहेत. आचारसंहिता जारी झाल्यावर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - वरणगाव नगरपालिकेतील भाजपचे ५ नगरसेवक अपात्र; खडसे गटाला जबर धक्का

Intro:जळगाव
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. तीन मतदारसंघात शिवसेनेचे तसेच उरलेल्या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर एकात अपक्ष आमदार आहे. भाजप-सेनेची युती तुटली तर भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते. लोकसभेतील युती कायम राहिली तरीही भाजपचेच पारडे सेनेच्या तुलनेत जड राहणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे.Body:केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार बळकट करण्यासाठी खान्देशातील जळगाव जिल्ह्याने भरभरून राजकीय बळ दिले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारखे वजनदार नेतेमंडळी आहेत. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल, अशीच सध्या चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या २००९ च्या फॉर्म्युल्यानुसार ११ पैकी सहा मतदारसंघ भाजपकडे तर पाच मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचा आमदार झाला आहे. त्यामुळे जागा वाटप करताना भाजप विद्यमान आमदारांचा मतदारसंघ सेनेला सोडणार नाही, सध्या तरी हे चित्र स्पष्ट आहे.

जळगाव शहर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर चोपडा, जळगाव ग्रामीण व पाचोरा-भडगाव या तीन मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा लागल्याने ते निवडणुकीच्या मैदानातून सध्या तरी बाद झाले आहेत. यामुळे तिथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा मार्ग तूर्त तरी मोकळा दिसतो आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप देखील या मतदारसंघात आपली ताकद लावून गुलाबराव पाटलांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेल्या पारोळा मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर आहे. तर अमळनेर मतदारसंघात मुख्यमंत्री त्याचप्रमाणे गिरीश महाजन सांगतील तो उमेदवार ठरणार असल्याने याही मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.Conclusion:या निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे तिकीट वाटप करताना भाजपत मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगतील तेच उमेदवार राहतील, अशी शक्यता आहे. इकडे आघाडीच्या तंबूत मात्र, वेगळी परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये इच्छुक कमी आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते यावेळी निवडणूक लढवायची की पाच वर्षे थांबायचे या विचारात आहेत. आचारसंहिता जारी झाल्यावर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

बाईट: १) डॉ. संजीव पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप (टक्कल पडलेले)
२) ऍड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (पांढरा सदरा)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.