ETV Bharat / state

कोरोना पाॅझिटिव्ह व संभाव्य रुग्णांनी घरात दागिने व रोकड ठेवू नये; पोलिसांचे आवाहन - जळगाव पोलीस नागरिक आवाहन

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला उपचारासाठी व घरातील इतर सदस्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येते. या काळात घर बंद असल्याची संधी साधून घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटना टाळण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह तसेच संशयित रुग्णांनी आपल्या घरात रोकड, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

Jalgaon Police
जळगाव पोलीस
author img

By

Published : Jun 28, 2020, 9:12 PM IST

जळगाव - कोरोना पॉझिटिव्ह तसेच संशयित रुग्णांनी आपल्या घरात रोकड, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाईन केले जात असल्याने घरे बंद असतात. हीच संधी साधून चोरटे चोरी करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून हे आवाहन केले आहे.

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला उपचारासाठी व घरातील इतर सदस्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येते. या काळात घर बंद असल्याची संधी साधून घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे जळगाव पोलिसांनी सांगितले.

भुसावळमध्ये झाली होती घरफोडी -

भुसावळ शहरात गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या डॉक्टर कुटुंबाकडे धाडसी घरफोडी झाली होती. हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणून चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. मात्र, या घटनेपासून बोध घेऊन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कुटुंबाने घर बंद करण्यापूर्वी रोकड व दागिने सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेत ठेवावे, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.