ETV Bharat / state

मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महापौरांचा सत्कार - जळगाव महापौर भारती सोनवणे शिवसेना सत्कार

राजकारण गाव पातळीवरील असो किंवा देश पातळीवरील सहसा कुठलाही पक्ष विरोधकांची स्तुती करत नाही. सत्कार वगैरे करणे तर दूरची गोष्ट. मात्र, जळगाव महानगरपालिकेमध्ये विरोधकांनी सत्ताधारी महापौरांचा सत्कार करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Jalgaon Mayor
जळगाव महापौर
author img

By

Published : Feb 27, 2021, 8:08 AM IST

जळगाव - महानगरपालिकेत नेहमी सत्ताधारी भाजपला शहरातील समस्यांबाबत घेरणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महासभा सुरू होण्याअगोदर महापौर भारती सोनवणे यांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौरांच्या कार्यकाळातील ही अखेरची महासभा असल्याने व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांबाबत शिवसेना नगरसेवकांकडून महापौरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात महापौरांचे स्वागत करण्यात आले. फेटा घालून, महापौरांना शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून महासभा सुरू होण्याआधी सत्कार केला.

पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महापौरांचा सत्कार करण्यात आला

१८ मार्च रोजी महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. शुक्रवारी झालेली महासभा ही कदाचित महापौर म्हणून भारती सोनवणे यांनी अखेरची महासभा असण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना नगरसेवकांनी कोणतीही पुर्वसूचना न देता, अचानकपणे महापौरांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते. महापौरांचे आपल्या दालनात आगमण झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. अचानकपणे केलेल्या या नियोजनाचा महापौरांसह भाजपच्या सर्वच नगरसेवकांना आश्वर्याचा धक्का बसला.

विरोधकांकडून पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा केलेल्या कामांसाठी सत्कार -

महानगरपालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. या कार्यकाळात शहरातील समस्यांबाबत शिवसेनेकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले गेले. मात्र, मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महापौरांचा त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबत जाहीर सत्कार झाला.

सुप्रीम कॉलनीतील कामाच्या पाठपुराव्यामुळे सत्कार -

शहरातील सुप्रीम कॉलनीतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी केलेला पाठपुरवठा, त्याच कॉलनीतील तीन्ही नगरसेवक शिवसेनेचे असतानाही अमृत योजनेचे केलेले काम यामुळे महापौरांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना नगरसेवकांकडून महापौरांना सन्मानपत्र देखील देण्यात आले आहे. यामध्ये महापौरांनी कोरोना काळात केलेली कामे व दाखवलेली तत्परता, शहरात लावण्यात आलले एलईडी, सागर पार्क मैदानावरील जॉगींग ट्रॅक या कामांसाठी महापौरांचे कौतुक केले आहे. दरम्यान, या सत्कारामुळे पुढील काळात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर देखील परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.